Advertisement

सर्जिकल स्ट्राईकचे अधिवेशनात पडसाद, सर्वपक्षीय नेत्यांनी केलं कौतुक

भारतीय वायुसेनेनं केलेल्या कारवाईचं संपुर्ण देशभरात कौतूक केलं जात आहे. तसंच, याचे पडसाद महाराष्ट्र विधानभवनाच्या बजेट सत्रात देखील उमटले आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी भारतीय वायूसेनेनं केलेल्या कारवाईचे कौतूक केले आहे.

सर्जिकल स्ट्राईकचे अधिवेशनात पडसाद, सर्वपक्षीय नेत्यांनी केलं कौतुक
SHARES

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेनं मंगळवारी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत २०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला.  भारतीय वायुसेनेनं केलेल्या कारवाईचं संपुर्ण देशभरात कौतूक केलं जात आहे. याचे पडसाद विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उमटले. सर्वपक्षीय नेत्यांनी भारतीय वायूसेनेनं केलेल्या कारवाईचं कौतुक केलं आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी भाजपा आणि शिवसेना यांच्यासह एमआयएम, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय वायूसेनेचं कौतुक केलं. तसंच या दुसऱ्या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारताची प्रतिमा जगात ताकतवान देश असल्याचा संदेश सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन दिला आहे.



राजकारण करू नये

समाजवादी पक्षाचे आमदार आणि राज्य अध्यक्ष अबू असिम आझमी तिरंगा घेऊन विधान भवनात पोहोचले होते. यावेळी त्यांनी हिंदुस्तान झिंदाबाद पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणाही दिल्या. भारतीय वायूसेनेनं पाकिस्तानला जे उत्तर दिलं आहे, त्यासाठी आम्ही वायूसेनेचं कौतूक करत आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. या हल्ल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारण करू नये, असं आवाहन देखील आझमी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलं. 


काँग्रेसची टाळाटाळ

काँग्रेसनं वायूसेनेनं पाकिस्तानावर केलेल्या हल्ल्यावर सांभाळून वक्तव्य केलं आहे. यापुर्वी केलेल्या हल्ल्यावर काँग्रेसनं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. परंतू यावेळी विधानभवनात काँग्रेस प्रसारमाध्यमांशी बोलणं टाळत होती. तर दुसरीकडे राहूल गांधी यांनी भारतीय वायूसेनेनं केलेल्या हल्ल्याचे ट्वीटरवरून कौतुक केलं आहे.


देश सरकारच्या बाजूनं

एमआयएमचे आमदार वारिश पठान यांनी या हल्ल्याचे कौतूक केलं आहे. भारतीय वायुसेनेनं पाकिस्तानाला योग्य ते उत्तर दिलं असून संपूर्ण देश सरकारच्या बाजूने उभा आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. 



हेही वाचा - 

पाकिस्तानला हादरवण्यासाठी मिराज-२००० विमानाचीच निवड का? जाणून घ्या...

दीड वर्षात आठ पुलांची होणार दुरुस्ती



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा