विधान मंडळाचे विशेष अधिवेशन 17 मे रोजी

  Mantralaya
  विधान मंडळाचे विशेष अधिवेशन 17 मे रोजी
  मुंबई  -  

  महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विधेयकासह संबंधित इतर विधेयकांना मंजुरी देण्यासाठी महाराष्ट्र विधानमंडळाचे विशेष अधिवेशन बुधवारी,17 मे 2017 रोजी घेण्याचा निर्णय मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तसेच संबंधित विधेयके विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात ज्या दिवशी मंजूर होतील, त्या दिवसाचे सभागृहाचे कामकाज समाप्त झाल्यानंतर विशेष अधिवेशन संस्थगित करण्याबाबत राज्यपालांना शिफारस करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

  संसदेने केंद्रीय वस्तू व सेवा कर विधेयक तसेच एकात्मिक वस्तू व सेवा कर विधेयक पारित केले असून, त्यास राष्ट्रपतींनी संमती दिली आहे. या कायद्यांची अंमलबजावणी 1 जूलै 2017 पासून अपेक्षित आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 246 (क) मधील तरतुदीनुसार केंद्र आणि राज्यास वस्तू व सेवांवर कर लावण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.