भाजापाचा महिलांसाठी विशेष जाहीरनामा

  Dadar (w)
  भाजापाचा महिलांसाठी विशेष जाहीरनामा
  मुंबई  -  

  दादर - महिलांसाठी भाजपाने मंगळवारी विशेष जाहीरनामा प्रकाशित केला आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांच्या सुरक्षा आणि संरक्षणाला प्राधान्य देत महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणासाठी वसंत स्मृती सभागृहात हा महिला जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. हा जाहीरनामा महिलांना रोजगार, संरक्षण, उद्योग, व्यवसाय त्याचबरोबर महिलांच्या सबलीकरणासाठी आणि सक्षमीकरणासाठी एक महत्वाचे पाऊल असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे.

  काय आहे भाजपाच्या विशेष महिला जाहीरनाम्यात

  • आरोग्य - कॅन्सरमुक्त महाराष्ट्र - सर्व आरोग्य केंद्रांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र रांग, स्वतंत्र खिडकी

  • महिलांसाठी स्वच्छतागृह - महिलांसाठी सर्व शहरांमध्ये 2 कि.मीच्या परिसरामध्ये स्वच्छ आणि सुरक्षित स्वच्छतागृहांचे निर्माण करणार, भाजी मंडई, उद्याने अशा महिलांचा अधिक वावर असणाऱ्या ठिकाणी स्वच्छतागृहांची व्यवस्था, महिला कामगारांसाठी फिरत्या स्वच्छता गृहांची व्यवस्था

  • घरकुल - झोपडपट्टी पुनर्विकासासाठी पंतप्रधान आवास योजना, क्लस्टर योजना राबविताना मिळणाऱ्या घरांच्या मालकीत महिलांना प्राधान्य, सहभाग आणि संयुक्त मालकी हक्क

  • संरक्षण - शालेय विद्यार्थ्यांना स्व-संरक्षणाचे धडे अनिवार्य, महिलांच्या स्वयंसंरक्षणासाठी मार्शल आर्टस् प्रशिक्षण, सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे, महानगर पालिकांनामध्ये महिला सुरक्षा दल निर्माण करणार

  • बचत गट - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वस्तू उद्योगासाठी निधी उपलब्ध करून देणार, महापालिका बाजारपेठेत अग्रस्थान देणार

  • श्रमिक महिला - वैद्यकीय सुविधा, औषधोपचार, स्वयंरोजगार प्रशिक्षण आणि पुनर्वसनासाठी विशेष प्रयत्न

  • जेष्ठ महिला नागरिक - डे केअर सेंटर, मोफत परिवहन सुविधा

  • अत्याचार - सर्व महापालिका मुख्यालयात, प्रभाग कार्यालयात तसेच महापालिका क्षेत्रातील खाजगी कार्यालयात लैंगिक छळाविरोधात विशाखा समिती स्थापनेसाठी पाठपुरावा

  • महिला लोकप्रतिनिधींचे नियमित प्रशिक्षण - महिला लोकप्रतिनिधींचे नेतृत्व सक्षम आणि सजग होण्याकरिता नियमित प्रशिक्षणाचे कार्यक्रम

  • महिला सक्षमीकरण - महिलांसाठी जेंडर बजेटमध्ये वाढीव विशेष आर्थिक तरतूद करणार. समाजकल्याण खात्याचा 50 टक्के निधी महिला साक्षमीकरणाच्या विविध योजनांसाठी आरक्षित ठेवण्याबाबत पाठपुरवठा, महिला बालकल्याण खात्याचा निधी महिला कल्याणार्थच वापरला जावा यासाठी स्वतंत्र अंदाज पत्रकाची शिफारस

  • शासकीय योजनांचा लाभ - आदिवासींसाठी कालादान योजना, माझी कन्या योजना, प्रधानमंत्री उज्ज्वल योजना, वैयक्तिक शौचालय योजना, शुभमंगल सामूहिक विमा योजना इत्यादी. सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून समूपदेशन

  • आयटी आणि माध्यम क्षेत्रातील महिला - आयटी क्षेत्रात तसेच प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियात कार्यरत महिला कर्मचाऱ्यांच्या सुविधा आणि सुरक्षिततेसाठी विशेष प्रयत्न

  • रोजगार - स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती करणार, राज्य आणि केंद्र शासनाच्या कौशल्य विकास मंत्रालयाशी संलग्न स्वयंरोजगार प्रशिक्षण देणारे आणि महिला उद्योगासाठी मदत केंद्र उभारणार, ताजी भाजी रास्त दरात मिळविण्यासाठी पालिकेतर्फे जास्तीत जास्त सार्वजनिक जागा देणार आणि व्यवसाय करण्यास महिलांना प्राधान्य

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.