Advertisement

'मराठा' टॅटूला विशेष मागणी; टी शर्टलाही मोर्चेकऱ्यांची पसंती!


'मराठा' टॅटूला विशेष मागणी; टी शर्टलाही मोर्चेकऱ्यांची पसंती!
SHARES

‘एक मराठा लाख मराठा’ अशी घोषणा देत बुधवारी मुंबईत मराठा क्रांती मूक मोर्चा निघत आहे. या मोर्चासाठी आयोजकांनी पूर्ण तयारी केली असून, मोर्चात सामील होणारे मोर्चेकरीही आपापल्या परीने तयारीला लागल्याचे पहायला मिळत आहे. आतापर्यंत राज्यभरात झालेल्या मोर्चांपेक्षा मुंबईतल्या मोर्चात सर्वाधिक गर्दी उसळेल असा दावा आयोजक करत आहेत.


मोर्चासाठी डिझास्टर मॅनेजमेंट सेल 

या भव्य मोर्चासाठी मराठा संघटनांची जोरदार तयारी सुरु आहे. शिवाजी पार्कमध्ये मराठा संघटनांचे डिझास्टर मॅनेजमेंट सेल काम करत आहे. ही टीम मराठा मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची काळजी घेणार आहे. शिवाजी मंदिरमध्ये 'वॉर रुम'ची देखील स्थापना करण्यात आली आहे.


टी-शर्ट/टॅटूला सर्वाधिक पंसती

मुंबईत मंगळवारपासूनच मराठा मोर्चाची जय्यत तयारी पहायला मिळाली. मुंबईच्या विविध भागात ‘एक मराठा लाख मराठा’ या सारखे विविध मेसेज लिहिलेले टी-शर्ट मुंबईच्या दादर परिसरात विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. याला सर्वाधिक पसंती मिळत असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे तरुणाई हातावर 'मराठा', 'जगदंब' लिहिलेल्या नावाचे टॅटू काढताना मुंबईमध्ये सर्वाधिक पहायला मिळत आहेत. त्यामुळे टॅटू आणि टी-शर्ट विक्रेत्यांची चलती पहायला मिळाली.


आजवर आम्ही सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे याठिकाणी मोर्चादरम्यान टॅटू काढण्याचे काम केले. मात्र मुंबईत टॅटू काढण्यासाठी जो प्रतिसाद मिळातोय तसा कुठेच मिळाला नाही! आता पर्यंत 3 ते 4 हजार टॅटू आम्ही काढले आहेत. विशेष म्हणजे मुली/महिलांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.

रवी माळी, टॅटू आर्टिस्ट



हेही वाचा - 

मराठा मोर्चासाठी मुंबई सज्ज! महापालिकेच्या विशेष सुविधा...

वाहनचालकांनो मराठा मोर्चाच्या तडाख्यात सापडू नका, या मार्गांचा करा वापर


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा