Advertisement

मोर्चेकरी शेतकऱ्यांसाठी मध्य रेल्वेकडून विशेष ट्रेन्स


मोर्चेकरी शेतकऱ्यांसाठी मध्य रेल्वेकडून विशेष ट्रेन्स
SHARES

नाशिक ते मुंबई असं जवळपास १८൦ किलोमीटरचं अंतर पायी चालत आलेल्या शेतकऱ्यांच्या परतीच्या प्रवासासाठी मध्य रेल्वेने विशेष ट्रेन्सची सोय केली आहे. चालत आलेल्या मोर्चेकरी शेतकऱ्यांचा प्रवास सुखकर व्हावा याच हेतूने ही सोय करण्यात आली आहे. त्यानुसार, मध्य रेल्वेकडून २ विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत.


मोर्चेकरी शेतकऱ्यांसाठी विशेष ट्रेन

० सीएसएमटी ते भुसावळ - सायंकाळी ८.३० वाजता, १३ जनरल कोच

० सीएसएमटी ते भुसावळ - रात्री १०.०० वाजता, १८ जनरल कोच

० सीएसएमटी ते मनमाड यादरम्यान पंचवटी एक्स्प्रेसमध्ये एक अतिरिक्त कोच लावण्यात येईल. ही गाडी सायंकाळी ६.१५ वाजता सुटेल.

० हावडा मेलला एक अतिरिक्त कोच शेतकऱ्यांसाठी लावण्यात येईल. ही गाडी रात्री ९.३० वाजता सुटेल.

० दादर-शिर्डी गाडीला एक अतिरिक्त कोच शेतकऱ्यांसाठी असेल. ही गाडी रात्री ९.४५ वाजता सुटेल.

किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी नाशिक ते मुंबई लाँग मार्च काढण्यात आला. त्यापैकी बहुतेक मागण्या राज्य सरकारने मान्य केल्यामुळे आंदोलन मागे घेत असल्याचं शेतकरी नेत्यांनी आझाद मैदानात जाहीर केलं. त्यामुळे आता हे सर्व शेतकरी बांधव परतीच्या प्रवासाला लागले आहेत.हेही वाचा

शेतकरी मोर्चा पूनम महाजनांना शहरी माओवाद वाटतोय!


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा