Advertisement

३३ खेळाडूंना मिळणार थेट शासकीय नोकरीत नियुक्ती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विविध खेळांमध्ये यश मिळवलेल्या खेळाडूंना थेट शासकीय सेवेत सामावून घेण्यासंदर्भातील बैठक शुक्रवारी मंत्रालयात पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ३३ खेळाडूंना शासन सेवेत सामावून घेण्याची सूचना केली.

३३ खेळाडूंना मिळणार थेट शासकीय नोकरीत नियुक्ती
SHARES

महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल केलेल्या अव्वल खेळाडूंना थेट शासन सेवेत नियुक्त करण्याचा एेतिहासिक निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतला अाहे. त्यासंदर्भातील निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी क्रीडा विभागाला दिले. राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा कुस्तीगीर राहुल अावारे यालाही शासन सेवेत थेट नियुक्ती देण्यात यावी, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं अाहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे क्रीडाप्रेमींनी स्वागत केलं असून इतक्या मोठ्या संख्येने थेट शासकीय नोकरी देण्याची घोषणा करणारा अाजचा दिवस महाराष्ट्राच्या क्रीडा इतिहासात सुवर्णअक्षरांनी नोंदला जाणार अाहे.


या खेळाडूंना मिळणार नोकरी

धावपटू ललिता बाबर, मोनिका अाथरे अाणि संजीवनी जाधव तसेच हाॅकीपटू देविंदर वाल्मिकी, कुस्तीपटू राहुल अावारे, कबड़्डीपटू सायली जाधव या महाराष्ट्राच्या अव्वल खेळाडूंना थेट शासकीय नोकरी मिळणार अाहे. सर्वसाधारण खेळाडूंमधून अालेल्या ९८ अर्जांपैकी २३ खेळाडूंना तर दिव्यांगांमधून अालेल्या २६पैकी १० अशा ३३ खेळाडूंना शासन सेवेत सामावून घेण्यात येणार अाहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गुणवत्ताधारक खेळाडूंना थेट शासकीय सेवेत सामावून घेण्यासंदर्भातील बैठक अाज मंत्रालयात अायोजित करण्यात अाली होती.


शासन सेवेत आलेल्या या ३३ खेळाडूंनी आपापल्या खेळात अधिकाधिक खेळाडू तयार करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करावे आणि उज्ज्वल यश संपादन करावे. या ३३ खेळाडूंना क्रीडा विभागात अ ते ड गट प्रवर्गात सामावून घेण्यात येणार आहे.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री


हेही वाचा -

चार वर्षांनंतर कमबॅक करणे मुश्किल – सुशीलकुमार

सर्फराझ खानला करायचीय मुंबई संघात घरवापसी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा