Advertisement

श्रेय घेण्यासाठी मित्रपक्षाला बगल


श्रेय घेण्यासाठी मित्रपक्षाला बगल
SHARES

मुंबई - एकीकडे शिवसेना आणि भाजपामध्ये पोस्टर वॉर सुरु असताना दुसऱ्या बाजूला मुंबईत सुरु होणाऱ्या कामाचं श्रेय घेण्यामध्येही दोन्ही सत्ताधारी पक्षांमध्ये कुरघोडी सुरु झाली आहे. मुंबई महापालिकेनं हाती घेतलेल्या कोस्टल रोडच्या सर्वेक्षणाची पाहणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांच्या सोबत गिरगाव चौपाटीवर केली. .या पाहणीसाठी शिवसेनेने भाजपाला पद्धतशीरपणे बाजूला ठेवले. तर भाजपाही मागे कुठे राहणार एनटीसीने एमएमआरडीला इंदू मिलची जमिनीवर असलेल्या स्ट्रक्चर तोडण्यासाठी परवानगी दिली. या वेळी भाजपाचे किरीट सोमय्या, भाई गिरकर, सुनील राणे यांनी इंदू मिलला भेट दिली, मात्र स्थानिक शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे आणि शिवसेनेचे स्थानिक आमदार सदा सरवणकर या कार्यक्रमाला गैरहजर होते. पालिका निवडणूक जवळ येऊ लागल्यानं शिवसेना आणि भाजपा मित्रपक्ष आता एकमेकांना पाण्यात पाहू लागले आहेत. त्यामुळे मुंबईमधील कामांचं श्रेय आणि मतं आपल्याचं पक्षाला मिळावे, असा प्रयत्न सध्या दोन्ही पक्षांमध्ये सुरु असल्याचं दिसू लागलंय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा