शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षामुळे दुकानदाराला आली जाग

 Andheri
शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षामुळे दुकानदाराला आली जाग
शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षामुळे दुकानदाराला आली जाग
शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षामुळे दुकानदाराला आली जाग
See all

अंधेरी - शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या दणक्यामुळे स्नेहांजली रिटेल प्रा. लि. कंपनीला जाग आली. जोगेश्वरीतील शिरीष मिश्रा यांनी स्नेहांजली रिटेल प्रा.लि कंपनीकडून गोदरेज कंपनीचा वॉशिंगमशीन विकत घेतली होती. मात्र मशिन मध्ये वारंवार बिघाड होत असल्यानं त्यांनी याबाबत सदर कंपनीला वारंवार रितसर तक्रार केली. मात्र तक्रार करूनही कंपनीकडून कोणतीच दखल न घेतल्यानं अंतिम उपाय म्हणून शिरीष मिश्रा यांनी शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण कक्षाकडे तक्रार केली. शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षानं याची दखल घेत सदर दुकानदाराशी संपर्क साधून गोदरेज कंपनीकडून 14000 हजार रूपये मिश्रा यांना मिळवून दिले. विरेंद्र पाठक, हेमंत मयेकर, रोहित हतपले यांनी धनादेश मिळवून दिल्याबद्दल शिरीष मिश्रा यांनी अरूण जगताप यांना पत्र देवून आभार मानले.

Loading Comments