Advertisement

शिवसेनेचं लक्ष्य... निवडणूक 2017


शिवसेनेचं लक्ष्य... निवडणूक 2017
SHARES

मलबार हिल - महापालिका निवडणूक तोंडावर असताना प्रत्येक पक्ष आपल्या पद्धतीनं जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न करतोय. डी विभागातल्या मलबार हिलमध्ये शिवसेना प्रभाग क्र. 214 च्या वतीनं शाखाप्रमुख किरण बाळसराफ यांच्या प्रयत्नांतून मलबार हिल उमरपार्क येथे गुरुवारी सकाळी नव्या फरशांचं आणि वाचनालयाचं उद् घाटन करण्यात आलं. खासदार अरविंद सावंत यांनी हे उद् घाटन केलं. या वेळी विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, विभाग संघटक माई परब, समन्वयक अरविंद बने, शाखा संघटक विजया शेलार आणि शिवसैनिक उपस्थित होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement