Advertisement

पेंग्विनच्या मृत्यूवरुन राजकारण सुरू


पेंग्विनच्या मृत्यूवरुन राजकारण सुरू
SHARES

मुंबई - वीरमाता जिजाबाई उद्यानात दक्षिण कोरियातून आणलेल्या आठ पेंग्विनपैकी एका पेंग्विनचा रविवारी मृत्यू झाला होता. राजकीय हट्टापायी लाखो रुपये खर्चून आणलेल्या पेंग्विनचा मृत्यू झाल्याने टीकाही सुरू झाली. बालहट्टापायी पेंग्विन आणल्याने त्याचा मृत्यू झाला. आता उर्वरित पेंग्विन परत पाठवावेत अशी मागणी मनसेने केली होती. मनसेच्या या टीकेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं. सोमवारी मातोश्रीवर एका पुस्तकाच्या कार्यक्रमामध्ये याबाबत विचारले असता उद्धव ठाकरे यांनी पेंग्विनपेक्षा पक्षाची काळजी करा असा टोला लगावलाय. 'पनवती लोकांकडूनच पेंग्विनवर टीका सुरू होती' असं त्यांनी म्हटलं आहे.
“ये तो होना ही था” अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री-राज ठाकरे यांच्यात ‘ए दिल है मुश्किल’ साठी झालेल्या वाटाघाटीसाठी केली होती. तोच धागा पकडून मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर पलटवार केला आहे. संदीप देशपांडे यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की, मनसेनं हे पेंग्विन आणण्यापूर्वीच विरोध केला होता आणि पेंग्विन मुंबईच्या वातावरणामध्ये राहू शकत नाही असे सांगितलं होतं तरी आठ पेंग्विन मुंबईच्या जिजामाता उद्यानामध्ये आणण्यात आलं. मग काय होणार “ये तो होना ही था”. दुसरीकडे काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनीही पेंग्विन प्रकरणी आदित्य ठाकरे आणि शिवसेनेवर टीका केली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा