सुमित मल्लिक यांनी मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला

 Mumbai
सुमित मल्लिक यांनी मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला

मुंबई - सुमित मल्लिक यांनी राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केला होता. मावळते मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी त्यांना पदाची सुत्रे सुपूर्द केली. भारतीय प्रशासन सेवेतील 1982 च्या तुकडीचे अधिकारी असलेले सुमित मल्लिक हे राजशिष्टाचार विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून काम पाहत होते. मुख्य सचिवांच्या दालनात मंगळवारी सायंकाळी सुमित मल्लिक यांनी पदभार स्वीकारून कामकाजास सुरुवात केली. सध्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय 31 जानेवारीलाच सेवानिवृत्त झाले होते. मात्र राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना एक महिन्याची मुदतवाढ मिळाली होती.

Loading Comments