Advertisement

राज्याचं आर्थिक वर्ष १ जानेवारीपासून सुरू होणार?


राज्याचं आर्थिक वर्ष १ जानेवारीपासून सुरू होणार?
SHARES

मुंबई - वार्षिक जमाखर्चाचा हिशेब एप्रिल ते मार्च यादरम्यान दिला जात असल्यानं बरीच धावपळ होते. त्यामुळे आता आर्थिक वर्षही कँलेडर वर्षासारखंच म्हणजे 1 जानेवारीला सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकार घेण्याची शक्यता आहे. राज्याच्या अर्थ खात्यातील अतिरिक्त मुख्य सचिव डी. के. जैन, प्रधान सचिव व्ही. गिरीराज आणि सचिव मिता लोचन यांनी जगभरातील २९ देश, ५० आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या आर्थिक वर्षाचा अभ्यास करून एक अहवाल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सोपवला आहे. त्यात 1 जानेवारीपासून आर्थिक वर्ष सुरू केलं जावं, अशी शिफारस करण्यात आली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा