महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप

 Azad Maidan
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप

सीएसटी - महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संयुक्त संघटनेच्या संघर्ष समितीने आजाद मैदानात बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांचे वेतन आणि निवृत्ती वेतनाचे दायित्व राज्य सरकारने स्विकारावे यासाठी हा संप पुकारण्यात आला.

22 नोव्हेंबर 2012 ला तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या आढावा बैठकीत ज्याप्रमाणे पाच महामंडळांची वेत्तन भत्याची जबाबदारी शासनाने स्विकारली आहे, त्याच धर्तीवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन आणि निवृत्ती वेतन भत्ते यांचे दायित्वसुद्धा शासनाने स्विकारावे. याबाबत मंत्रीमंडळ टिप्पणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी मुंबईत दिले होते. मात्र त्यावर अदयाप कोणतीही अंमलबजावणी झाली नाही. या कर्मचाऱ्यांचे वेतन आणि निवृत्ती वेतनाची जबाबदारी शासनाने स्विकारावी, या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संयुक्त संघटना संघर्ष समिती अध्यक्ष देवेंद्र लांडगे यांनी सांगितले.

पिण्याच्या पाण्याची मानवी मूलभूत गरज भागवण्यासाठी, शासनाचे विविध कार्यक्रमाचे नियोजन आणि नियमन करणारी शासनाची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ही अंगीकृत संस्था सुरळीत चालावी आणि त्याचा फायदा सामान्य जनतेस व्हावा आदी संघटनेच्या मागण्या आहेत.

Loading Comments