शिवरायांशिवाय कुणासमोरही झुकणार नाही - उद्धव ठाकरे

Fort, Mumbai  -  

मुंबई - शिवसेनाप्रणित स्थानिय लोकाधिकार समितीच्या वतीने फोर्ट परिसरात आयोजित शिवराय संचलनाच्या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, नवनिर्वाचित महापौर विश्वनाथ महाडेश्वर, उपमहापौर हेमांगी वरळीकर यांच्यासह आमदार, मंत्री, शिवसैनिक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या वेळी शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की सलग पाचव्यांदा विजयी झालो आहोत. यावेळचा विजय मागच्या चार वेळा मिळालेल्या विजयापेक्षा नक्कीच वेगळा आहे. निवडणूक असो वा नसो, आमच्या हातात भगवाच राहणार. दुसरा कुठलाही पक्ष नको, झेंडा नको. आम्ही शिवरायांसमोर झुकणारे इतर कोणाही समोर झुकणार नाहीत. एकमेकांवर जे काय फेकाफेकी करायची ती झाली. होळी, धुळवड, रंगपंचमी जे काय व्हायचं ते झालंय. केंद्र सरकारमध्ये 2 लाखांपेक्षा जास्त नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. या ठिकाणी जास्तीत जास्त मराठी मुले कामाला लागली पाहिजे यासाठी लोकाधिकार समितीने प्रयत्न करायला पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांचे भाषण झाल्यानंतर जमलेल्या सर्व शिवप्रेमींनी यावेळी फोर्ट भागात वाजत-गाजत मिरवणूक काढली.

Loading Comments