Advertisement

'...अन्यथा मुख्यमंत्र्यांविरोधात गुन्हा नोंदवू'


'...अन्यथा मुख्यमंत्र्यांविरोधात गुन्हा नोंदवू'
SHARES

मुंबई - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील टोलवसुली पूर्ण झाल्याने टोलवसुली बंद करावी अशी मागणी टोल अभ्यासक आणि सर्वसामान्यांकडून केली जात आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) कडे यासंबधी पाठपुरावा करून झाला. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र पाठवली. पण याची दखल काही घेतली जात नाही. त्यामुळे टोल अभ्यासकांनी 15 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नोटीस पाठवली. मात्र अद्याप उत्तर न आल्याने सरकार जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत आहे. सरकारची टोल बंद करण्याची इच्छाशक्ती नाही, असे म्हणत टोल अभ्यासक आता आक्रमक झाले आहेत. त्यानुसार पुढील 15 दिवसांत टोल बंद झाला नाही तर, मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे आणि एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेशाम मोपलवार यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गुन्हा दाखल करू असा इशारा सोमवारी टोल अभ्यासक विवेक वेलणकर यांनी दिला.
मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत टोल अभ्यासक वेलणकर, संजय शिरोडकर, प्रवीण वाटेगावकर आणि श्रीनिवास घाणेकर यांनी हा इशारा दिला. गुन्हे नोंदूवनही टोलवसुली बंद झाली नाही, तर मग याप्रकरणी न्यायालयात धाव घेण्याचीही तयारी दाखवली आहे. त्यामुळे आता टोलचा प्रश्न पेटण्याची शक्यता आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा