पालिका निवडणुकीत युती होणार?

  मुंबई  -  

  मुंबई - राज्यातल्या अनेक जिल्ह्यातील नगरपंचायतीचे निकाल सोमवारी लागलेत. या नगरपंचायतीमध्ये भाजपनं आपलं कमळ फुलवत काँग्रेस, राष्ट्रवादीला धोबीपछाड दिलं.

  मात्र आता खरी लढाई आहे, ती मुंबई महानगर पालिका निवडणुकीची. त्यातच नगरपंचायतीचे निकाल पाहता भाजप-शिवसेनेने अप्रत्यक्षरीत्या युतीचे संकेत मुंबईत दिलेत. एकमेकांवर कायम आरोप-प्रत्यारोप करणारी भाजपा-शिवसेना एकाच व्यासपीठावर पाहायला मिळालेत. नुसतेच एकत्र पाहायला मिळाले नाही तर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांवर स्तुती सुमने उधळलीत. निमित्त होतं पालिकेच्या नव्यानं तयार करण्यात आलेल्या अद्ययावत आपतकालीन व्यवस्थेच्या लोकापर्णाचं.
  मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई आहे. त्यातच भाजपाचाही या पालिकेकडे डोळा आहे. मात्र दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होवू नये यासाठी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस सावध भुमिका घेताना दिसतायेत. त्यामुळे येत्या पालिका निवडणूकीत भाजप-शिवसेना युती करतायेत का? कि भाजप शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवतायेत हे पाहणं औत्सुक्याचं ठरेलं. मात्र सध्या तरी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री अप्रत्यक्षरिता का होईना युतीच्या तयारीत आहेत हे मात्र नक्की.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.