Advertisement

नजीब अहमदला मिळणार का न्याय?


नजीब अहमदला मिळणार का न्याय?
SHARES

सीएसटी - दिल्लीच्या जे.एन.यू विद्यापीठातील नजीबवर झालेल्या हल्ल्यामागे आरएसएस असल्याचा दावा स्टुंडड इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाने केला आहे. तसंच याविरोधात राज्यभर निषेध नोंदवणार असल्याचं स्टुंडड इस्लामिकचे अध्यक्ष सलमान अहमद यांनी सांगितलं. सोमवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जे.एन.यू विद्यापीठातील खोली क्रमांक 106 मध्ये नजीबवर हल्ला झाला. त्याचा तपास अजूनही लागलेला नाही.

विद्यापीठ प्रशासन, दिल्ली पोलीस पक्षपाती आणि दुपट्टी धोरणांमुळे नजीबचा शोध घेण्यास आणि अे.बी.व्ही.पीच्या कार्यकर्त्यांना शिक्षा देण्यास निष्क्रिय ठरली आहे. त्यामुळे मुस्लिम विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. भारतामध्ये मुस्लिम विद्यार्थ्यांबाबत अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत. काही सत्ताधारी पक्षांकडून सहकाऱ्यांच्या मदतीने शिक्षण संस्थेतील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही अहमद यांनी या वेळी केला.

नजीब अहेमदला न्याय मिळवून देण्यासाठी एस.आय.ओ कडून 01 ते 15 फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रात पाच लाख आणि मुंबई शहरात जवळपास दिड लाख स्वाक्षरी अभियान राबवण्यात येणार आहे. तसंच 24 फेब्रुवारीला नवी दिल्ली येथे मानव अधिकार भवनावर भव्य निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. 20 ते 28 फेब्रुवारीला राज्य स्तरावर निषेध कार्यक्रम आयोजन करण्यात येणार असल्याचे सलमान अहमद यांनी सांगितलं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा