Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
54,05,068
Recovered:
48,74,582
Deaths:
82,486
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
34,288
1,240
Maharashtra
4,45,495
26,616

भाजपला सुप्रीम कोर्टातही धक्का, महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदाचा दावा फेटाळला

मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याची भाजपची आशा संपुष्टात आली असून हे पद आता काँग्रेसकडेच राहणार हे स्पष्ट झालं आहे.

भाजपला सुप्रीम कोर्टातही धक्का, महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदाचा दावा फेटाळला
SHARES

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणारा अर्ज फेटाळण्यात आल्याने भाजपला जोरदार धक्का बसला आहे. यामुळे मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याची भाजपची आशा संपुष्टात आली असून हे पद आता काँग्रेसकडेच राहणार हे स्पष्ट झालं आहे. 

फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेना (shiv sena) क्रमांक एकचा, तर भाजप (bjp) दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. भाजपने शिवसेनेसोबत मिळून सत्तेत बसण्यास नकार दिल्याने भाजपला विरोधी पक्षात बसण्याची संधी होती. परंतु आम्ही पहारेकऱ्याच्या भूमिकेत राहणार असल्याचं म्हणत भाजपने ही संधी नाकारली. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक रवी राजा (congress opposition leader ravi raja) यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली. 

त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजप-शिवसेनेची युती तुटून शिवसेनेने राज्यात राष्ट्रवादी, काँग्रेससोबत आपला संसार थाटला. तर भाजपला विरोधी बाकांवर बसावं लागलं. यामुळे महापालिकेत देखील विरोधी बाकांवर बसून शिवसेनेला विविध विषयांवर कोंडीत पकडण्याचा डाव भाजपने रचला. त्यासाठी आवश्यक विरोधी पक्षनेतेपदावर दावा देखील ठोकला. 

हेही वाचा- मुंबई महापालिकेत काँग्रेसच शिवसेनेचा विरोधक 

परंतु महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांनी विरोधी पक्षनेतेपद हे घटनात्मक पद असल्याने ते काँग्रेसकडून काढून भाजपला देता येणार नाही, असं स्पष्ट केलं. त्यानंतर भाजपने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. भाजप हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष असल्यानं भाजपला विरोधी पक्षनेतेपद मिळावं, असा मुद्दा याचिकेत मांडण्यात आला होता. त्यावर झालेल्या सुनावणीत महापौरांनी रवी राजा यांना विरोधी पक्षनेतेपदी नियुक्त करताना आपल्या अधिकाराचा गैरवापर केलेला दिसत नाही. त्यांनी कायद्याच्या कक्षेत राहूनच निर्णय घेतला आहे. २०१७ साली भाजपने हे पद नाकारलं होतं. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यासारखं महत्त्वाचं पद एखाद्या व्यक्तीच्या किंवा पक्षाच्या लहरीनुसार बदलणं हे कायद्यात बसत नाही, असं खंडपीठानं स्पष्ट केलं. त्यामुळं काँग्रेसचे रवी राजा यांच्याकडेच विरोधी पक्षनेतेपद कायम राहीलं.

मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला भाजपचे नगरसेवक व गटनेते प्रभाकर शिंदे यांनी रिट याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होतं. त्यात काँग्रेसचे रवी राजा यांनाही याचिकादारांनी प्रतिवादी केलं होतं. अखेरीस त्यावरील सुनावणीअंती सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील पीठाने प्रभाकर शिंदे यांचं अपिल फेटाळून लावलं. सद्यस्थितीत मुंबई महापालिकेच्या एकूण २२७ जागांपैकी शिवसेनेकडे ९२ जागा असून भाजपकडे ८२ तर काँग्रेसकडे ३० जागा आहेत. 

(supreme court rejects bjp plea to appoint opposition leader in bmc)

हेही वाचा- मुंबई काँग्रेसला राखायचंय विरोधीपक्ष नेतेपद!

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा