Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,09,215
Recovered:
47,07,980
Deaths:
79,552
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
37,656
1,657
Maharashtra
5,19,254
39,923

मुंबई महापालिकेत काँग्रेसच शिवसेनेचा विरोधक

मुंबई उच्च न्यायालयाने भाजपचा हा दावा फेटाळून लावत काँग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद कायम राहील, हे स्पष्ट केलं आहे.

मुंबई महापालिकेत काँग्रेसच शिवसेनेचा विरोधक
SHARES

शिवसेनेसोबतची युती तुटल्यानंतर भाजपने संख्याबळाच्या आधाराने मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला होता. परंतु मुंबई उच्च न्यायालयाने भाजपचा हा दावा फेटाळून लावत काँग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद कायम राहील, हे स्पष्ट केलं आहे. यामुळे शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी मोर्चेबांधणी करणाऱ्या भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. (congress remains on opposition leader post in bmc after bombay high court dismisses bjp plea)

मुंबई महापालिकेच्या २०१७ साली झालेल्या निवडणूक निकालानंतर भाजप आणि शिवसेनेचं बिनसलं होतं. त्यानंतर सत्तेत जाऊन बसण्याऐवजी सत्तेच्या बाहेर राहून पहारेकऱ्याची भूमिका निभावण्याचं भाजपने ठरवलं होतं. एवढंच नाही, तर त्यावेळी राज्यात शिवसेना-भाजप युतीचं सरकार असल्याने महापालिकेत विरोधी पक्षनेतेपद न घेण्याचं देखील भाजपने ठरवलं होतं. त्यामुळे महापालिका निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या काँग्रेसकडे नियमानुसार विरोधी पक्षनेतेपद आलं. 

हेही वाचा - मराठा आरक्षणावरची अंतरिम स्थगिती हटवण्यासाठी न्यायालयात अर्ज

त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजप-शिवसेनेची युती तुटून शिवसेनेने राज्यात राष्ट्रवादी, काँग्रेससोबत आपला संसार थाटला. तर भाजपला विरोधी बाकांवर बसावं लागलं. यामुळे महापालिकेत देखील विरोधी बाकांवर बसून शिवसेनेला विविध विषयांवर कोंडीत पकडण्याचा डाव भाजपने रचला. त्यासाठी आवश्यक विरोधी पक्षनेतेपदावर दावा देखील ठोकला. परंतु महापौर किशोरी पेडणेकर यांनी विरोधी पक्षनेतेपद हे घटनात्मक पद असल्याने ते काँग्रेसकडून काढून भाजपला देता येणार नाही, असं स्पष्ट केलं. त्यानंतर भाजपने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. सद्यस्थितीत मुंबई महापालिकेच्या एकूण २२७ जागांपैकी शिवसेनेकडे ९२ जागा असून भाजपकडे ८२ तर काँग्रेसकडे ३० जागा आहेत. 

भाजप हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष असल्यानं भाजपला विरोधी पक्षनेतेपद मिळावं, असा मुद्दा याचिकेत मांडण्यात आला होता. त्यावर न्यायमूर्ती एस. जे. काथावाला व माधव जामदार यांच्या खंडपीठापुढं याचिकेवर सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान महापौरांनी रवी राजा यांना विरोधी पक्षनेतेपदी नियुक्त करताना आपल्या अधिकाराचा गैरवापर केलेला दिसत नाही. त्यांनी कायद्याच्या कक्षेत राहूनच निर्णय घेतला आहे. २०१७ साली भाजपने हे पद नाकारलं होतं. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यासारखं महत्त्वाचं पद एखाद्या व्यक्तीच्या किंवा पक्षाच्या लहरीनुसार बदलणं हे कायद्यात बसत नाही, असं खंडपीठानं स्पष्ट केलं. त्यामुळं काँग्रेसचे रवी राजा यांच्याकडेच विरोधी पक्षनेतेपद कायम राहणार आहेत.

राज्यात महाविकास आघाडी असली तरी मुंबई महापालिकेत अशी कुठलीही आघाडी नाही. त्यामुळे महापालिकेत काँग्रेस आक्रमकपणे विरोधकाची भूमिका बजावताना दिसणार आहे. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा