Advertisement

“महापालिकेतील सत्ताधारी तिजोरी चाटूनपुसून खात आहेत”

मुंबईकर कोविडच्या महामारीत मृत्यूशी झुंज देत आहेत आणि सत्ताधारी कंत्राटदारांसोबत तिजोरी चाटूनपुसून खात आहेत, असं म्हणत भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी विकास निधी वाटपावरून सत्ताधारी शिवसेनेवर आरोप केला.

“महापालिकेतील सत्ताधारी तिजोरी चाटूनपुसून खात आहेत”
SHARES

सत्ताधाऱ्यांनी नगरसेवक निधीवर डल्ला मारला. मुंबईकरांना काय मिळालं? इथं मुंबईकर कोविडच्या महामारीत मृत्यूशी झुंज देत आहेत आणि सत्ताधारी कंत्राटदारांसोबत तिजोरी चाटूनपुसून खात आहेत, असं म्हणत भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी विकास निधी वाटपावरून सत्ताधारी शिवसेनेवर आरोप केला. (bjp mla ashish shelar criticises shiv sena over bmc corporator fund distribution)

नालेसफाईचा दावा ११३ टक्क्यांचा केला. आता नगरसेवक निधीवर ७३ टक्के डल्ला मारला. मुंबईकरांना काय मिळालं? गोरगरिबांच्या घरात पाणी शिरलंच. मुंबईची तुंबई झालीच. रस्त्यांवर खड्डे पडलेच. मग हे टक्के कुठे गेले? मुंबईकर कोविडशी लढत असताना, पालिकेत सत्ताधाऱ्यांच्या टक्केवारीचे घोडे चौखूर उधळत आहेत. महापौरांच्या मुलालाच कोविड सेंटरमधील मलिद्याचं कंत्राट. शिवसेनेच्या नगरसेवकांना ५३५.९५ कोटींचा निधी. वा! मुंबई महापालिकेत सत्ताधाऱ्यांची "प्रिपेड" समाजसेवा जोरात!

इथे मुंबईकर कोविडच्या महामारीत मृत्यूशी झुंज देत आहेत आणि सत्ताधारी कंत्राटदारांसोबत तिजोरी चाटूनपुसून खात आहेत! असा आरोप आशिष शेलार यांनी केला.

हेही वाचा - महापौरांनी स्वत:च्या मुलाला मिळवून दिलं कोविड सेंटरचं काम, मनसेचा आरोप

मुंबई महापालिकेच्या सन २०२०-२१च्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यासाठी कोरोनाच्या संकटामुळे तब्बल ५ महिन्यांनंतर गुरुवारी २० ऑगस्ट रोजी पालिका सभागृहाची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीत महापालिकेने केलेल्या निधीवाटपाची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. त्यात एकूण ७२८ कोटी रुपयांच्या निधी पैकी शिवसेनेला ५३५.९५ कोटी, तर भाजपला ९८.६१ कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याने भाजपने संताप व्यक्त केला.

एकूण निधी वाटपापैकी शिवसेना (९७ नगरसेवक): ५३५.९५ कोटी रुपये निधी (७३ टक्के), 

भाजप (८३ नगरसेवक) : ९८.६१ कोटी : (१३ टक्के), काँग्रेस (२९ नगरसेवक) : ५२.१० कोटी : (१० टक्के), राष्ट्रवादी (८ नगरसेवक) : १८.७० कोटी : (२ टक्के), समाजवादी पक्ष (६ नगरसेवक) : २२.७५ कोटी : (५ टक्के) अशा पद्धतीने निधीचं वाटप करण्यात आलं.

हे निधी वाटप असमान असून शिवसेना नगरसेवकांना झुकतं माप देऊन निधी वाटप करून इतर नगरसेवकांवर अन्याय करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला. तर निधी वाटपात कुणावरही अन्याय झालेला नाही, असा बाजू महापौरांनी मांडली. 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा