Advertisement

'किन्नर बोर्ड'साठी तृतीयपंथीयांचं अजितदादांना निवेदन

तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी लवकरात लवकर किन्नर बोर्ड स्थापन करण्यात यावं, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

'किन्नर बोर्ड'साठी तृतीयपंथीयांचं अजितदादांना निवेदन
SHARES

तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी लवकरात लवकर किन्नर बोर्ड स्थापन करण्यात यावं, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. मंगळवारी सुप्रिया सुळे यांनी तृतीयपंथीयांसमवेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन याबाबतचं निवेदन त्यांना दिलं.

वेगवेगळ्या समस्या आणि नवीन उपक्रमाबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यासमवेत बैठका घेतल्या. यावेळी सुळे यांनी किन्नर समाजाच्या प्रश्नांबाबतही एक विशेष बैठक बोलावली होती. ज्यात किन्नर समाजाचे शिष्टमंडळही हजर होते. मागील अनेक वर्षांपासून किन्नर समाजाच्या असंख्य मागण्या प्रलंबित आहेत. किन्नर समाजाच्या बोर्डाची मागणी त्यात प्रामुख्याने होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ बोर्डाबाबत निर्णय घेण्याचे आदेश दिले. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी २० दिवसात किन्नर बोर्ड स्थापन करण्याचे आश्वासन दिले. 

तृतियपंथीयांच्या कल्याणासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणारे व खूप दिवसांपासून प्रलंबित असणारे किन्नर बोर्ड लवकरात लवकर स्थापन करण्याचे आश्वासन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलं असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. धनंजय मुंडे यांनी मंगळवारी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला. मंत्रालयातील कार्यालयात जाऊन त्यांनी पदभार स्विकारला. यावेळी सर्वच वर्गातील समाजाच्या न्याय हक्कासाठी काम करेन, असे आश्वासन त्यांनी दिलं. 

धनंजय मुंडे, आणि राज्यमंत्री राजेश टोपे यांना आपल्या ट्विटरमध्ये टॅग करून लवकरात लवकर तृतियपंथीयांच्या कल्याणासाठी किन्नर बोर्ड सुरू करा, असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं. तसंच, सर्वांना समान न्याय हक्क यासाठी आपण ठामपणे उभे राहिले पाहिजे, असेही सुप्रिया यांनी म्हटलं आहे. 



हेही वाचा -

नाराज वडेट्टीवारांची मंत्रिमंडळ बैठकीला दांडी

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा