Advertisement

सुशांत प्रकरणात जे काही झालं ते योग्य नव्हतं, नितीश कुमारांनी बोलून दाखवली खदखद

बिहार पोलिसांनी नोंदवलेला एफआयआर आणि केलेला तपास योग्यच आहे, हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातून स्पष्ट होतं.

सुशांत प्रकरणात जे काही झालं ते योग्य नव्हतं, नितीश कुमारांनी बोलून दाखवली खदखद
SHARES

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सुप्रीम कोर्टाने  सीबीआयकडे सोपवल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री  नितीश कुमार त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली. मात्र या प्रकरणात प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मुंबई पोलिसांविरोधातली नाराजी बोलून दाखवली. मात्र मुंबई पोलिसांचं काहीही चुकलं नाही, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं.

हेही वाचाः- सुशांत आत्महत्या प्रकरण : बिहार IPS विनय तिवारींना मुंबई सोडण्याची परवानगी

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात बिहार पोलिसांनी सुशांतचे वडिल के.के. सिंह यांनी यांनी रिया चक्रवर्ती विरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाच्या तपासासाठी बिहार पोलिसांचे विशेष पथक मुंबईला आले. अवघ्या चार दिवसांत बिहार पोलिसांनी मोठ्या प्रमाणात या प्रकरणाशी संबधित गोष्टी मिळवल्या, हीबाब मुंबई पोलिसांना न रुचल्याने त्यांनी तपासात अडथळा आणण्यास सुरूवात केल्याचा आरोप बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी केला. या प्रकणाच्या तपासासाठी आलेल्या आयपीएस अधिकार्याला कोरोनाचे नियम व अटी सांगून क्वारनटाईन करण्यात आले.या घटनेची गंभीर दखल घेत बिहारच्या मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नाराजी व्यक्त करत केंद्र सरकारला हा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली.


त्यानुसार रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने हा गुन्हा पुढील तपाससाठी सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश दिला. या आदेशानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. नितीश कुमार म्हणाले, "सुशांत प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर त्याची चौकशी करणं ही बिहार पोलिसांची जबाबदारी होती, मात्र त्यांना मुंबई पोलिसांकडून सहकार्य मिळालं नाही. आमच्या आयपीएस अधिकाऱ्याला कशी वागणूक दिली हे सर्वांना माहिती आहे. जे काही झालं ते योग्य नव्हतं, हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातूनही स्पष्ट होतं आहे. या परिस्थितीवर राजकीय प्रतिक्रिया देणं योग्य नाही" "बिहार पोलिसांनी नोंदवलेला एफआयआर आणि केलेला तपास योग्यच आहे, हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातून स्पष्ट होतं. फक्त सुशांत सिंह राजपूतचं कुटुंब किंवा बिहारचे नागरिकच नाही तर संपूर्ण देशाला या प्रकरणात न्याय हवा आहे. सीबीआय चौकशीमुळे हा मिळेल असा विश्वास सर्वांना आहे", असंही नितीश कुमार म्हणाले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा