नितीश कुमार यांचा राज ठाकरेंना टोला

  मुंबई  -  

  काही लोकांनी मुंबईत बिहार दिवस साजरा करण्यास विरोध केला होता. अशा लोकांची डोकी आता थंड झाली आहेत, असे वक्तव्य करून नितीश कुमार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. 

  बिहारमधील लोकं कोणावरही निर्भर नसतात. कोणावर अवलंबून नसतात. बिहारचे लोक सर्व ठिकाणी वसले आहेत. असे वाटते की विना बिहारी लोकांची कामेच होणार नाहीत. बिहारच्या लोकांनी आपल्या ज्ञान आणि क्षमतेमुळे एक वेगळी ओळख बनवली आहे. बिहारी लोकांमुळे कित्येकांना रोजगार मिळत आहे. असे वक्तव्य बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मुंबईत केले. मुंबईमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मैथली समन्वय समितीने नितीश कुमार यांच्या अभिनंदनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमामध्ये नितीश कुमार यांनी हे वक्तव्य केले.

  आपल्या छोटेखानी भाषणात नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनाही अप्रत्यक्ष टोला लगावला. आम्ही कोणाची कॉपी करत नाही. कामावरून लोकांना विकास झाल्याचे कळते. बिहारमध्ये केलेल्या कामाचा आम्ही प्रचार केला नाही आणि प्रचार करण्याची गरजही नाही. लोकांना बिहारमधील विकास दिसत आहे आणि लोकच बिहारच्या विकासाचा प्रचार करत आहे, असा टोला नितीश कुमार यांनी लगावला.

  नितिश कुमार यांच्या या वक्तव्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनीही सडेतोड उत्तर दिले आहे.


  नितीश कुमार आल्याने बिहारचा विकास झाला ही आनंदाची गोष्ट आहे. पण मुंबईत वास्तव्याला असलेले बिहारी भूमीपूत्राने बिहारमध्ये परतावं, तसंच राहिला आमच्या डोक्याचा प्रश्न, तर ते आधीपासूनच शांत आहे 

  - बाळा नांदगावकर, मनसे नेते 

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.