Advertisement

मनसेच्या व्यासपीठावर पहिल्यांदाच स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा

मनसेच्या व्यासपीठावर पहिल्यांदाच प्रखर हिंदुत्वाचे प्रतिक असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमाही ठेवण्यात आली आहे.

मनसेच्या व्यासपीठावर पहिल्यांदाच स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा
SHARES

मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को मैदानात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं महाअधिवेशन सुरू आहे. या महाअधिवेशनात नुकताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं. तसंच, या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यव्यापी अधिवेशनाच्या तयारीदरम्यान अनेक नव्या गोष्टी पाहायला मिळत होत्या. यामध्ये विशेष म्हणजे या अधिवेशनात व्यासपीठावर महापुरुषांच्या प्रतिमा लावण्यात आल्या असून यांमध्ये पहिल्यांदाच प्रखर हिंदुत्वाचे प्रतिक असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमाही ठेवण्यात आली आहे.

मनसेच्या व्यासपीठावर स्वातंत्र्यावीर सावरकर यांची प्रतिमा असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तसंच, सावरकरांची प्रतिमा असल्यानं या अधिवेशनात राज ठाकरे काय भूमीका मांडणार? याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. त्याशिवाय, राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचंही या महाअधिवेशनाच्या निमित्तानं राजकीय क्षेत्रात लॉन्चिंग केलं जाणार असल्याची चर्चा आहे.

राज ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण करण्यात आलं आहे. यासाठी सभागृहात भव्य स्टेज उभारण्यात आला आहे. या स्टेजवर महापुरुषांच्या फोटोंमध्ये प्रखर हिंदुत्वाचे प्रतिक असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा पहिल्यांदाच ठेवण्यात आली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमांचाही यामध्ये समावेश आहे.

१८ हजार लोकांच्या बसण्याची क्षमता असलेल्या या सभागृहात मर्यादीत मनसे कार्यकर्त्यांनाच निमंत्रित करण्यात आलं आहे. यासाठी मनसेचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बारकोडद्वारे नोंदणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर भगव्या रंगाची रिबीन असलेले विशेष पासही त्यांना देण्यात आले आहेत. तसेच सभागृहाबाहेर भगवे झेंडे लावण्यात आले आहेत.



हेही वाचा -

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं राज्यव्यापी महाअधिवेशन

मेट्रोच्या पासधारकांसाठी अमर्यादित प्रवासाची सुविधा



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा