Advertisement

मनसुख हिरेन प्रकरणात पुराव्यांसोबत छेडछाड, आशिष शेलारांचा आरोप

अँटिलिया स्फोटक प्रकरणातील संशयित मनसुख हिरेन याच्या मृत्यूचा तपास करण्यात येत असताना पुराव्यांसोबत जाणीवपूर्वक छेडछाड झाल्याचा आरोप भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा केला आहे.

मनसुख हिरेन प्रकरणात पुराव्यांसोबत छेडछाड, आशिष शेलारांचा आरोप
SHARES

अँटिलिया स्फोटक प्रकरणातील संशयित मनसुख हिरेन याच्या मृत्यूचा तपास करण्यात येत असताना पुराव्यांसोबत जाणीवपूर्वक छेडछाड झाल्याचा आरोप भाजप नेते आमदार आशिष शेलार (ashish shelar) यांनी पुन्हा एकदा केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी आशिष शेलार यांनी मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाबाबत अनेक दावे केले. ते म्हणाले, मनसुख हिरेन यांच्या तोंडावर दिसलेले रुमाल शवविच्छेदन अहवालातून गायब असल्याचं पुढं येत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असताना विविध पातळीवर पुराव्यांशी छेडछाड झाल्याचं उघड होतं आहे. 

मृतदेहाच्या फुफुसामध्ये पाणी सापडले तर त्या पाण्याची डायटोम टेस्ट करणं आवश्यक होतं. हिरेन यांच्या शरिरिरात पाणी सापडलं नाही मग त्यांचे अवयव डायटोम टेस्टसाठी का पाठवण्यात आले. टेस्ट जे.जे. रूग्णालयात होत नाही. तशी परवानगी नाही. तरीही मनसुख यांचे अवयव जे.जे. रूग्णालयात का उघडण्यात आले? असा प्रश्नही आशिष शेलार यांनी उपस्थित केला.

मनसुख यांच्या मृतदेहाचं दोन तास शवविच्छेदन चाललं, तरी एक-एक मिनिटांच्या व्हिडिओ क्लिप्स देण्यात आल्या. त्यांनी आत्महत्या केली, असं राज्य सरकारच्या दबावामुळे दाखवण्यात येत आहे.

हेही वाचा- मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयकडे द्या, ठाणे न्यायालयाचा एटीएसला आदेश

या प्रकरणात लपवाछपवी करायची असल्यानेच स्थानिक पोलिसांना काम करू दिलं नाही. जे केले ते चुकीचं केलं. पुराव्यात छेडछाड करण्यात आली. एटीएसला छापेमारी करू दिली नाही. म्हणून राज्य सकारला ही केस एटीएसकडून एनआयएकडे द्यायची नव्हती. 

मनसुख हिरेन यांच्या खूनाचे प्रकरण आता एनआयएकडे गेलं आहे. पण एनआयएकडे जाण्याआधी याप्रकरणी ठाकरे सरकार ही केस एनआयएकडे देण्यास तयार नव्हतं. शेवटी ठाण्याच्या न्यायालयाने निर्देश दिले. त्यामुळे ठाकरे सरकारसमोर अन्य पर्यायच उरला नाही.

त्यामुळे या प्रकरणातील पुराव्यांशी छेडछाड करणारे, पोलीस, डॉक्टर, त्यांना आदेश देणारे मंत्री, नेते या सगळयांची चौकशी आता एनआयए करावी!, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.

(tampering with evidence in mansukh hiren murder case alleged bjp mla ashish shelar)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा