Advertisement

बेस्टच्या विरोधात मनसेची बॅनरबाजी


बेस्टच्या विरोधात मनसेची बॅनरबाजी
SHARES

शिवडी - दिवसेंदिवस तोट्यात जात असलेल्या बेस्ट परिवहन विभाग हा तोटा भरून काढण्यासाठी ग्राहकांना नवनवे कर विद्युत बिलात आकारण्याचे प्रकार होत आहेत, असा आरोप मनसे शाखाध्यक्ष शेखर मोकल यांनी केला असून याच्या निषेधार्थ सध्या पालिकेच्या एफ- दक्षिण विभागातील प्रभाग क्रमांक 206 मध्ये ठीक ठिकाणी फलक लावण्यात आले आहेत.

नोव्हेंबर महिन्यातील बेस्ट च्या विद्युत बिलांमध्ये ग्राहकांना 'व्हिलिंग आकार' या नावे नवा कर लागू केला असून कमीत कमी 100 रु. तर जास्ती जास्त 700 रु. शुल्क आकारण्यात येत असल्याने नागरिकांनामधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
यापूर्वी 'परिवहन विभाग तूट' या नावाने आकारणी करून भरमसाट विद्युत बिल ग्राहकांकडून बेस्ट वसूल करीत होते. याविरोधात मनसेने पुढाकार घेऊन आंदोलने केली आणि हा मुद्दा ग्राहकांच्या वतीने न्यायालयात मांडला. त्यानुसार न्यायालयाने 'परिवहन विभाग तूट' बंद चा निर्णय बेस्ट ला सूनावला. मात्र आता 'व्हिलिंग आकार' या नावे सुरु करण्यात आलेला नवा कर बंद करण्यात यायला हवा अन्यथा 'व्हिलिंग आकार बंद करा नाहीतर खळ खटयाळ निश्चित समजा' हा मुद्दा घेऊन आंदोलन करू असा इशारा मनसे शाखाध्यक्ष शेखर मोकल यांनी दिला असून माजी आमदार बाळा नांदगावकर यांच्यासॊबत या मुद्यावर चर्चा करून बेस्ट परिवहन विद्युत विभागाला निवेदन देण्यात येणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा