उद्धव ठाकरे म्हणतात 'युतीची कासवगती'!

  Bandra East
  उद्धव ठाकरे म्हणतात 'युतीची कासवगती'!
  मुंबई  -  

  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना युतीबाबत विचारले असता कासवगतीने युती पूर्वपदावर येत असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. व्हेंटिलेटर, कासव यासारख्या चित्रपटांनी राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. या चित्रपटातील कलाकारांनी मंगळवारी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांनी व्हेंटिलेटरवर असलेल्या शिवसेना-भाजपा युतीबद्दल विचारले असता शिवसेना-भाजपा युती कासवगतीने पूर्वपदावर येत असल्याचा फिल्मी टोला उद्धव ठाकरे यांनी मारला.

  राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या चित्रपटांचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार यांचे कौतुक उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच या चित्रपटांचा एक महोत्सव एप्रिल महिन्याच्या शेवटी शिवसेना चित्रपट शाखेच्या वतीने मुंबईत आयोजित करण्यात येईल अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

  पाकिस्तानात कैदेत असलेले कुलभूषण जाधव यांच्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, केंद्र सरकारने फक्त पत्रव्यवहार करून काही होणार नाही. पाकिस्तानला एकदा कायमचा धडा शिकवला पाहिजे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.