Advertisement

सदा सरवणकरांचं पिस्तुल जप्त, अडचणीत वाढ होण्याची शक्यता

प्रभादेवीत शिवसेना आणि शिंदे गटात झालेल्या राडा प्रकरणी सदा सरवणकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

सदा सरवणकरांचं पिस्तुल जप्त, अडचणीत वाढ होण्याची शक्यता
SHARES

प्रभादेवीत शिवसेना आणि शिंदे गटात झालेल्या राडा प्रकरणी सदा सरवणकर (MLA Sada Sarvankar) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांचं पिस्तुल जप्त करण्यात आलं आहे. दादर पोलिसांनी सदा सरवणकरांचं पिस्तुल जप्त केलं आहे.

विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या राड्यावेळी सदासरवण यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता. तसेच, याप्रकरणी चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली होती. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला आहे. तसेच, घटनास्थळावरुन पोलिसांकडून गोळीही जप्त करण्यात आली होती.

गणेश विसर्जनासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शिवसेना आणि शिंदे गटाच्या समर्थकांमध्ये मोठा राडा झाला होता. प्रभादेवी या ठिकाणी गणेश विसर्जनावेळी शिवसेना आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसैनिकांना शांत राहण्याचे आदेश दिल्यानंतर संघर्ष टळला होता. परंतु शनिवारी हा वाद पुन्हा उफाळून आला.

सदा सरवणकर समर्थकांकडून शिवसैनिकांना डिवचण्याचा प्रयत्न केल्यानंतर शाब्दिक बाचाबाचीही झाली. यानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी शिवसेना विभागप्रमुख महेश सावंत (Mahesh Sawant) यांच्यासह शिवसैनिकांना पिस्तूलचा धाक दाखवून गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता. त्यानंतर सदा सरवणकर यांच्यासह समर्थकांवर गुन्हा दाखल झाला.

गणेश विसर्जनच्या दिवशी प्रभादेवी परिसरात शिवसेनेकडून गणेश भक्तांचे स्वागत करण्यासाठी मंच उभारण्यात आला होता. मात्र, या मंचाच्या शेजारी शिंदे गटाने देखील आपला मंच उभारला होता. या मंचावरून शिंदे गटाच्या लोकांनी शिवसेनेच्या नेत्यांवर अपशब्द वापरले. त्यामुळे दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाचीदेखील झाली. या वादाचे रुपांतर मध्यरात्रीतील राड्यात झाले.

शिंदे गटात असलेले माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि वरळीतील शिवसेनेच्या माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर यांच्यात वाद झाले होते. दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर शनिवारी शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती.



हेही वाचा

'डबे जोडण्याच काम सुरू', राज ठाकरेंच्या विधानामुळे चर्चांना उधाण

दादर : शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा