राष्ट्रपतींच्या फेसबुक पेजवर एका कंपनीची जाहिरात

 Mumbai
राष्ट्रपतींच्या फेसबुक पेजवर एका कंपनीची जाहिरात
Mumbai  -  

विरार - भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या ऑफिशियल फेसबुक पेजवर एक जाहीरात झळकतेय. डोमेन म्हणजेच ड्रीम बीजंट असं या जाहीरातीत झळकणाऱ्या कंपनीचं नाव आहे. राष्ट्रपतींच्या ऑफिशियल फेसबुक पेजवर गेल्यावर त्याच्याखालीpresidentofindia@rb.nic.in आणि त्यानंतर http://dreambigent.com/ ही लिंक येते. http://dreambigent.com/ क्लिक केल्यावर एक डोमेनची वेबसाईट ओपन होते. या घटनेला समोर आणलंय विरारमध्ये राहणाऱ्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअर रहिम नरसिंगदानी यांनी. त्यांनी ट्विटरवरुन एक लिंक शेअर केली आहे, त्यासोबत एक व्हीडिओ देखील शेअर केला आहे.
त्या लिंकवर क्लिक केलं की तुम्हाला भारताच्या राष्ट्रपतींच्या फेसबुक पेजवर झळकत असलेल्या ड्रीम बीजंट या कंपनीच्या जाहिराती दिसतील.

Loading Comments