Advertisement

कोकणात पाणबुडीत बसून पाहता येणार समुद्राखालील जग

पर्यटकांसाठी पाणबुडी उपलब्ध करून देणे हे विचाराधीन आहे. या पाणबुडीमध्ये बसून पर्यटक मारीन लाईफ पाहू शकतील

कोकणात पाणबुडीत बसून पाहता येणार  समुद्राखालील जग
SHARES

लवकरच कोकण किनारपट्टीवरच्या मरीन लाइफ म्हणजेच पाण्याखालचे जग पाणबुडीतून पाहण्याची संधी मिळणार आहे. कोकणात पर्यटकांचा ओघ वाढावा आणि येणार्‍या मंडळींना पर्यटनाचाही अनोखा अनुभव मिळावा म्हणून महाराष्ट्र शासन पाणबुडीच्या माध्यमातून त्यांना पाण्याखालच्या या अद्भुत जगाचे दर्शन करून देण्याचा विचार करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेमध्ये याबाबत घोषणा केली.

हेही वाचाः- ​रासायनिक रंग व वृक्षतोड करणाऱ्यांवर होणार कारवाई, होळी साजरी करणाऱ्यांनो सावधान!​​​

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या परुळे चिपी विमानतळावर काम सुरू असून १ मे रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीला ६0 वर्षे पूर्ण होत असून या दिवशी हे विमानतळ कार्यन्वित करण्यात येईल, असे ठाकरे म्हणाले. शेजारी गोवा हे राज्य असल्यानं त्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न होत आहे. सध्या मालवणमध्ये अंडरवॉटर ड्रायव्हिंगची सोय उपलब्ध आहे. तारकर्लीमधल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कुबा डायव्हिंग अँड स्पोर्ट्समध्ये पर्यटकांना स्कुबा डायविंग करता येते, असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, पर्यटकांसाठी पाणबुडी उपलब्ध करून देणे हे विचाराधीन आहे. या पाणबुडीमध्ये बसून पर्यटक मारीन लाईफ पाहू शकतील. आपल्या कोकणामध्ये पहिल्यांदा सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले. त्याचप्रमाणे एलिफंटा, खांदेरी-उंदेरी, जंजिरा येथे जलदुर्गांची श्रृंखला पर्यटकांसाठी पर्यटनाला उपलब्ध करून देण्यात येईल. तिलारी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये कॉन्झर्वेशन रिझर्व्ह स्थापन करणे प्रस्तावित आहे. यामुळे निसर्ग आणि वन्य प्राण्यांचे संवर्धन होईलच आणि त्याच वेळेला त्या भागांमध्ये येणार्‍या पर्यटकांचा ओढसुद्धा वाढेल, असंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचाः -​कोस्टल रोडने घेतले दोन पोलिसांचे बळी​​​

कोकणातलं निसर्गसौंदर्य जपलं पाहिजे, असं उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाचे नाव न घेता सांगितलं. मी हेलिकॉप्टरमधून बघताना सुद्धा मला समुद्राचा तळ दिसत होता, कारण तिथलं पाणी स्वच्छ होतं. कृत्रिम प्रकल्पांना आपण विकास म्हणणार असू तर त्यापेक्षा अधिक वैचारिक दारिद्र आणि अन्याय कशामध्येही नाही. हे आपलं वैभव आहे आणि ते जपायला हवं, असं ठाकरे यांनी आवर्जून सांगितलं. कोकणामध्ये जिथे गरज आहे तेथे रुग्णालये सुरू करण्यात येतील आणि एप्रिलमध्ये व्हायरोलॉजी लॅबसुद्धा स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा