Advertisement

श्रेयवादाची ‘दंगल’


SHARES

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी शिवस्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी मुंबईत आले. या वेळी क़ाँग्रेसच्या संजय निरुपम यांनी त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी श्रेयवादाच्या लढाईमध्ये शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांनीही घोषणाबाजी करून पंतप्रधानांसमोरच गोंधळ घातला.
नरेंद्र मोदी यांचा जलपूजन कार्यक्रम शांतपणे पार पडण्यासाठी शुक्रवारी संध्याकाळी मच्छीमार संघटनाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी नोटबंदीच्या विरोधात वांद्रे-कुर्ला संकुलमध्ये मूक मोर्चाचं आयोजन केलं. पोलिसांनी त्यांना आंदोलनास मनाई करत त्यांच्याच घरामध्ये नजरकैदेत ठेवलं. पोलिसांनी त्यानंतर निरुपम यांना इतर कार्यकर्त्यांसह ताब्यातही घेतलं.
दुसरीकडे नरेंद्र मोदी यांचे वांद्रे-कुर्ला संकुलामध्ये आगमन होताच भाजपा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. चंद्रकांत पाटील यांच्या भाषणाच्यावेळी शिवसैनिकांचा जोर चढला आणि त्यांचाही आवाज वाढला. या वेळी शिवसैनिकांनी आवाज कुणाचा शिवसेनेचा अशा घोषणा द्यायला सुरुवात केल्या. तर भाजपाकडून हर हर मोदी, घर घर मोदी च्या घोषणा सुरू होत्या. दोन्हीकडून आवाज वाढल्याने नरेंद्र मोदी स्टेजवर असतानाच दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते भिडले. अखेर मग मुख्यमंत्र्यांनाच शांततेचं आवाहन करावं लागलं.
देवेंद्र फडणवीस आवाहन करताना
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाषणाला उभे राहिले तेव्हा शिवसैनिकांनी पुन्हा घोषणा सुरु केल्या. कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला अशा जोरजोराने घोषणा दिल्या. दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते जरी मनोमिलन झाल्याचे दाखवत असले तरी त्यांच्या कार्यकर्त्यांचे वर्तन मात्र वेगळंच संकेत देत आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा