'...तर आम्हालाही विधानसभेतून निलंबित करा'

Mumbai
'...तर आम्हालाही विधानसभेतून निलंबित करा'
'...तर आम्हालाही विधानसभेतून निलंबित करा'
See all
मुंबई  -  

मुंबई - शेतकरी कर्जमाफीसाठी आक्रमक भूमिका घेतल्याबद्दल 19 आमदारांना निलंबित केले. तर मग आम्हीसुद्धा या मागणीवर आक्रमक होतो. त्यामुळे आम्हालासुद्धा निलंबित करा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी विधानसभाध्यक्षांना पत्र लिहून केली आहे.

विधानसभेचे अध्यक्ष हरीभऊ बागडे यांना लिहिलेल्या या पत्रात मागील 2 आठवड्यांपासून विरोधी पक्ष सातत्याने शेतकरी कर्जमाफीची मागणी लावून धरत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

राज्याचा 2017-18 चा अर्थसंकल्प सादर होत असताना विरोधी पक्षांच्या आक्रमक भूमिकेचे निमित्त साधून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण 19 सदस्यांना 31 डिसेंबर 2017 पर्यंत निलंबित करण्यात आले. ही कारवाई सरकारने आकसपूर्ण पद्धतीने केली होती. त्यामुळे ज्या पद्धतीने 19 आमदारांचे निलंबन करण्यात आले, त्याच पद्धतीने आणि त्याच कालावधीसाठी आमचंही निलंबन करावं, असं या तीनही नेत्यांनी पत्रात लिहिलं आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.