Advertisement

यंदाचा दसरा मेळावा ऑनलाइन होणार नाही हे निश्चित - संजय राऊत

यंदा शिवाजी पार्क मैदानात दसऱ्याच्या दिवशी भगवमय वातावरण पाहायला मिळणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

यंदाचा दसरा मेळावा ऑनलाइन होणार नाही हे निश्चित - संजय राऊत
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा हा ऑनलाईन पार पडला. पंरतू 'यंदाचा दसरा मेळावा नक्कीच होईल आणि तो ऑनलाईन पद्धतीने होणार नाही हे निश्चित', असं विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. त्यामुळं यंदा शिवाजी पार्क मैदानात दसऱ्याच्या दिवशी भगवमय वातावरण पाहायला मिळणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरवर्षी विजयादशमी रोजी म्हणजेच दसऱ्याला दादरमधील शिवाजी पार्क परिसरात शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं आयोजन केलं जातं. गतवर्षी हा दसरा मेळावा कोरोनाच्या सावटाखाली पार पडला. दूरदृष्टी प्रणालीच्या माध्यमातून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केलं. मात्र, यंदा कोरोनाचं सावट असलं तरी दसरा मेळावा होणार, असं विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

संजय राऊतांच्या या विधानानंतर शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी राहुल गांधी यांची राऊतांनी काल भेट घेतली. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना राऊतांनी हे वक्तव्य केलं.

''दसरा मेळावा नक्कीच होईल आणि तो ऑनलाईन पद्धतीने होणार नाही हे निश्चित. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन दसरा मेळाव्यासंबंधित निर्णय घेण्यात येईल'', असं संजय राऊत यांनी म्हटलं.

मुंबईसह राज्यभरात गुरूवार ७ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सावाला सुरूवात होत आहे. सर्व सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ व घराघरात देवीचे आगमन झालं आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा