Advertisement

मनुस्मृतीला विरोध केल्यास जीवे मारू; छगन भुजबळ यांना धमकी

नाशिक येथील भुजबळ फार्महाऊसवर हे धमकीचं निनावी पत्र अालं अाहे. जर तुम्ही मनुस्मृतीला विरोध केला तर तुमचाही दाभोळकर, पानसरे करू अशा अाशयाचं हे पत्र अाहे.

मनुस्मृतीला विरोध केल्यास जीवे मारू; छगन भुजबळ यांना धमकी
SHARES

मनुस्मृतीला विरोध केल्यास तुमचाही दाभोळकर, पानसरे करू अशी धमकी एका पत्रातून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना देण्यात अाली अाहे. नाशिक येथील भुजबळ यांच्या फार्महाऊसवर अज्ञाताने पत्र पाठवून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली अाहे. 


चौकशीची मागणी

छगन भुजबळ यांना अालेल्या या धमकीच्या पत्राने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली अाहे. नाशिक येथील भुजबळ फार्महाऊसवर हे धमकीचं निनावी पत्र अालं अाहे. जर तुम्ही मनुस्मृतीला विरोध केला तर तुमचाही दाभोळकर, पानसरे करू अशा अाशयाचं हे पत्र अाहे. यासंदर्भात नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी पोलिस अायुक्तांची भेट घेऊन तक्रार नोंदवणार अाहेत. या पत्राची लवकरात लवकर चौकशी व्हावी अशी मागणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करत अाहेत. 


संविधान हवंय

छगन भुजबळ यांनी वेळोवेळी मनुस्मृतीचा निषेध केला अाहे. अाम्हाला मनुस्मृती नकोय, डाॅ. बाबासाहेब अांबेडकर यांचे संविधान हवंय, असं नुकतंच भुजबळ यांनी नागपूरमध्ये म्हटलं अाहे. हेही वाचा - 

बाळासाहेबांनी पक्ष स्थापन केला म्हणून उद्धव आहेत, अजित पवारांचा पलटवार

अजित पवार मुतऱ्या थोबाडाचे, शिवसेनेची सामनातून टीका
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा