Advertisement

महापौर पदाच्या उमेदवारांसमोर तगडे आव्हान


महापौर पदाच्या उमेदवारांसमोर तगडे आव्हान
SHARES

मुंबई - मुबईचे महापौरपद यंदा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहे. या पदासाठी शिवसेनेकडून विद्यमान स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे आणि भाजपाकडून महापालिका गटनेते मनोज कोटक यांची नावे चर्चेत आहेत. परंतु या दोन्ही उमेदवारांपुढे तगडे आव्हान आहे. आपल्या विभागातील हा उमेदवारच महापौरपदाचा दावेदार असल्यामुळे विभागातील नागरिकांवरच याची मोठी जबाबदारी पडली आहे. उमेदवारांनीही असाच प्रचार केल्यामुळे नागरिकही आता द्विधा मनस्थितीत अडकले आहेत. त्यांना मतदान न करून विभागाला मिळणारा महापौरपदाचा मान का गमवायचा का? या विचारातच जनता पडली आहे.

शिवसेनेचे यशोधर फणसे हे अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला परिसरातील प्रभाग क्रमां 60 मधून निवडणूक लढवत आहेत. शिवसेनेची पुन्हा सत्ता आल्यावर फणसे हेच महापौर होतील. त्यामुळे याभागात त्यांचे समर्थक महापौर पदाचे उमेदवार म्हणून त्यांचा प्रचार करत आहेत. तर भाजपाची सत्ता आल्यास मनोज कोटक यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे त्यांचे समर्थकही कोटक यांचा प्रचार भावी महापौर म्हणूनच करत आहेत.

यशोधर फणसे यांच्यासमोर विद्यमान काँग्रेस नगरसेविका जोस्ना दिघे यांच्यासह स्थानिक आमदार भारती लव्हेकर यांचा भाचा आणि भाजपा उमेदवार त्यागराज दभाडकर यांचे आव्हान आहे. तर कोटक यांच्यासमोर माजी महापौर काँग्रेसचे नेते आर. आर. सिंह यांचे पुत्र डॉ. आर. आर. सिंह आणि शिवसेनेचे संसारे यांचे आव्हान आहे. दोघांच्या संमर्थकांकडून अशाप्रकारे प्रचार होत असल्यामुळे सुजाण नागरिकांना मतदानाचा अधिकार बजावताना भावी महापौरांचे चेहरे दुर्लक्षित करून चालणार नाही.

यासंदर्भात यशोधर फणसे आणि मनोज कोटक यांनी बोलण्यास नकार दिला असून सध्या निवडून येणे हेच ध्येय असल्याचे त्या दोघांनी सांगितले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा