SHARE

जोगेश्वरी - बंडोबांमुळे जोगेश्वरीमध्ये गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवसेनेतून अनेक इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांना ही निवडणूक सोपी राहिलेली नाही.

विद्यमान नगरसेवक अनंत(बाळा) नर यांना वॉर्ड क्रमांक 77 मधून तिकीट मिळाल्याने शिवसेनेतून इच्छुक असणारे ज्ञानेश्वर सावंत, दत्ता शिरसाट, श्रीधर खाडे आणि नारायण सावंत हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे वॉर्ड क्रमांक 77 मध्ये शिवसेना आपला दबदबा कायम ठेवणार का हे पहावं लागणार आहे. त्यातच माजी नगरसेवक शैलेश परब यांना देखील तिकीट नाकारल्याने ते देखील नाराज आहेत.

तर दुसरीकडे प्रभाग क्रमांक 72 मधून अनिल माने,73 मधून प्रवीण शिंदे, 74 मधून रचना सावंत, 78 मधून नेहा शेख आणि 79 मधल्या सदानंद परब या शिवसेना उमेदवारांना देखील जिंकण्यासाठी मेहनत करावी लागणार आहे. दरम्यान गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी शिवसेनेने केलेल्या विकासकामांमुळे आम्हांला गड राखण्यात यश मिळेल असं 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना सांगितले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या