Advertisement

सिटी सेंटर माॅलला आग: आदित्य ठाकरेंनी केलं अग्निशमन दलातील जवानांचं कौतुक

राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री मुंबई सेंट्रल येथील आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या सिटी सेंटर माॅलची पाहणी केली.

सिटी सेंटर माॅलला आग: आदित्य ठाकरेंनी केलं अग्निशमन दलातील जवानांचं कौतुक
SHARES

राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री मुंबई सेंट्रल येथील आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या सिटी सेंटर माॅलची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेकडो लोकांचा जीव वाचवणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांचं कौतुक केलं. ही आग अजूनही धुमसत असून अग्निशमन दलाचे जवान मोठ्या प्रयत्नाने आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. (tourism minister aaditya thackeray visits city center mall mumbai central)

सिटी सेंटर मॉलमध्ये आगीची घटना घडली होती, सदर घटनास्थळी नुकतीच भेट दिली. या घटनेबाबत मी सातत्याने माहिती घेत होतो. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे. आपल्या मुंबई फायर ब्रिगेडच्या धाडसी जवानांनी अग्निशामक रोबोट या आधुनिक तंत्रज्ञानासह आग विझविण्यासाठी यशस्वीपणे कार्य केलं, असं यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

त्याआधी मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी शुक्रवारी दुपारी पाहणी केली. शिवाय ही आग नेमकी कशामुळे लागली, हे शोधून काढण्यासाठी संबंधीत दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देखील अस्लम शेख यांनी आदेश दिले. यावेळी त्यांच्यासोबत अमिन पटेल देखील उपस्थित होते.

मुंबई सेंट्रलमधील सिटी सेंटर मॉलमध्ये गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास भीषण आग लागली होती. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी जीव धोक्यात घालून मॉलमध्ये अडकलेल्या ४०० हून अधिक नागरिकांची सुखरुप सुटका केली. तर आग विझवण्याच्या प्रयत्नात अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाला आहे.

हेही वाचा - आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या सिटी सेंटर मॉलची पालकमंत्र्यांकडून पाहणी

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement