Advertisement

तिहेरी तलाक विधेयक अखेर मंजूर

गुरूवारी तिहेरी तलाकचं विधेयक चर्चेसाठी येणार असल्यानं गुरूवारी लोकसभेत नेमकं काय होणार याकडेच सर्वाचं लक्ष लागलं होतं. या विधेयकाला काही मुस्लिम संघटनांचा जोरदार विरोधही होता. पण अखेर हे विधेयक आता मंजुर झाल्यानं लवकरच तिहेरी तलाकचा कायदा लागू होईल.

तिहेरी तलाक विधेयक अखेर मंजूर
SHARES

मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण विधेयक-२०१८ गुरूवारी लोकसभेत सादर करण्यात आलं. या विधेयकावर मतदान घेत तिहेरी तलाक विधेयक अखेर लोकसभेत मंजुर करण्यात आलं आहे. हे विधेयक अत्यंत महत्त्वाचं असून त्यावर सखोल अभ्यास व्हायला हवं, अशी भूमिका घेत काँग्रेसनं मतदानाच्या आधीच सभात्याग केला. 

काँग्रेसच्या सभात्यागानंतर २५६ खासदारांनी मतदान केलं. त्यानुसार २४५ विरूद्ध ११ मतांनी विधेयक मंजुर करण्यात आल असून आता लवकरच या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होणार आहे. तर या कायद्यामुळे तिहेरी तलाकसारखी अनिष्ट प्रथा नष्ट होण्यास मदत होणार आहे. 


विधेयकाला विरोध

तिहेरी तलाक बेकायदा ठरवणाऱ्या विधेयकावर गुरूवारी लोकसभेत चर्चा झाला. हे विधेयक कोणत्याही समाज किंवा धर्माविरोधात नसल्याचं मत कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मांडलं. तर काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जून खरगे यांनी या विधेयकाचा अभ्यास व्हायला हवा, त्यासाठी विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवले पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका मांडली. त्यानंतर काँग्रेसनं मतदानाच्याआधीच सभात्याग केला. पण काँग्रेसच्या विरोधानंतर, सभात्यागानंतरही विधेयक बहुमतानं मंजूर करून घेण्यात सरकारला यश आलं आहे. 


 लवकरच कायदा लागू 

गुरूवारी तिहेरी तलाकचं विधेयक चर्चेसाठी येणार असल्यानं गुरूवारी लोकसभेत नेमकं काय होणार याकडेच सर्वाचं लक्ष लागलं होतं. या विधेयकाला काही मुस्लिम संघटनांचा जोरदार विरोधही होता. पण अखेर हे विधेयक आता मंजुर झाल्यानं लवकरच तिहेरी तलाकचा कायदा लागू होईल. हा कायदा लागू झाल्यास तिहेरी तलाकसाऱखी अनिष्ट प्रथा नष्ट होईल असा विश्वास यानिमित्तानं व्यक्त केला जात आहे.



हेही वाचा - 

Good News! सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

फ्लॅशबॅक २०१८: 'एल्गार' जारी रहे..!




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा