Advertisement

शेतकरी कर्जमाफीवरुन राजकीय 'बडवा-बडवी'!


शेतकरी कर्जमाफीवरुन राजकीय 'बडवा-बडवी'!
SHARES

सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर केली असली, तरी सध्या यावरुन राज्यात राजकीय ढोल वाजायला सुरुवात झाली आहे. कर्जमाफीच्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी करत शिवसेना सोमवारी राज्यभर आंदोलन करणार आहे. राज्यातील सर्व जिल्हा बँकांमध्ये सोमवारी सकाळी 11 वाजता ‘ढोलनाद’ करणार आहे. मात्र शिवसेनेच्या या ढोल बडवायच्या भूमिकेवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार टीका केली आहे.



...तर मंत्रालयासमोर ढोल वाजवा

ढोल वाजवायची एवढी हौस शिवसेनेला आली असेल तर जिल्हा बँकांसमोर ढोल वाजवण्यापेक्षा त्यांनी मंत्रालयासमोर ढोल वाजवून जुलै 2017 पर्यंतच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी अशी मागणी करावी, असा टोला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेला लगावला आहे. शिवसेनेने ढोल वाजवण्यापेक्षा कर्जमाफीसाठी बँकांना तातडीने निधी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळात संमत करुन घ्यावा असे आव्हानही विखे पाटील यांनी शिवसेनेला केले आहे. एकीकडे शिवसेनेचे मंत्री सरकारसोबत बसून 2016 पर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला दुजोरा देतात, तर दुसरीकडे त्यांचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे 2017 पर्यंत कर्जमाफी झाली पाहिजे, असे म्हणतात. त्यामुळे शिवसेनेची भूमिका नेमकी कोणती? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.


अन्यथा शेतकरी मातोश्रीसमोर ढोल वाजवतील...

शेतकरी आधीच एवढा त्रस्त झाला आहे. अजून शेतकऱ्यांना उल्लू समजू नका. अन्यता शेतकरी मातोश्रीवर येऊन ढोल वाजवतील, अशी घणाघाती टीका देखील विखे पाटील यांनी यावेळी केली आहे.


शिवसेनेची अवस्था 'चला हवा येऊ द्या'!

शिवसेनेची दुटप्पी भूमिका पाहून शिवसेनेची अवस्था ‘चला हवा येऊ द्या’ अशी झाल्याची टीका देखील विखे पाटील यांनी यावेळी केली आहे. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जरी झाला असला, तरी राज्यात यावरुन राजकारण रंगतंय. मात्र आता या राजकारणात ढोल आला आहे. त्यामुळे नेमका कोण किती मोठ्याने ढोल वाजवतोय? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

एकीकडे सरकारच्या मांडीला मांडी लावून बसायचे आणि दुसरीकडे बाहेर ढोल वाजवायचे हा दुट्टपीपणा असल्याचे सांगताय त्यापेक्षा डोके बडवून घ्या. शिवसेना राज्य आणि केंद्र सरकारमध्ये सहभागी आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या अंमलबजावणीची जबाबदारी त्यांचीच आहे. ते त्यांचे घटनात्मक कर्तव्य आहे, असे असताना जिल्हा बँकांसमोर ढोल बडवण्याचे नाटक करण्याऐवजी त्यांनी शासन म्हणून आपले कर्तव्य पार पाडावे.  

धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते विधान परिषद


हेही वाचा - 

शेतकरी कर्जमाफीवरून श्रेयवादाचा अंक सुरू

कर्जमाफी झालेले मुंबईतले 813 शेतकरी कोण?



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा