Advertisement

निलेश राणेंच्या धमकीला घाबरत नाही- रोहीत पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहीत पवार आणि भाजपचे नेते माजी खासदार निलेश राणे यांच्यात सध्या जोरदार ट्विटरवाॅर सुरू आहे. या वादात निलेश राणे यांच्या धमकीला आपण घाबरत नसल्याचं रोहीत पवार म्हणाले

निलेश राणेंच्या धमकीला घाबरत नाही- रोहीत पवार
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहीत पवार आणि भाजपचे नेते माजी खासदार निलेश राणे यांच्यात सध्या जोरदार ट्विटरवाॅर सुरू आहे. या वादात रोहीत पवार यांना अपशब्द सुनावत त्यांच्यावर प्रहार करणारे निलेश राणे यांच्या धमकीला आपण घाबरत नसल्याचं रोहीत पवार म्हणाले आहेत.  

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साखर कारखान्यांच्या संदर्भात पत्र पाठवलं होतं. या पत्रावर टीका करताना निलेश राणे यांनी साखर विषयावर किती पैसे महाराष्ट्रात खर्च झाले यावर आॅडिट झालंच पाहिजे. साखर कारखाने करोडोंची उलाढाल करतात, राज्य सरकार, राज्य बँक, जिल्हा बँका सगळे साखर व्यवसायाला वर्षोंवर्ष साथ देत आलेत. तरी वाचवा?? असा प्रश्न उपस्थित केला होता. 

त्याला मी आपणास सांगू इच्छितो की शरद पवारांनी साखर उद्योगासह 'कुक्कुटपालन' व इतर उद्योगातील दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठवून उपाययोजना सुचवल्या आहेत. ते प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडत असल्यानेच पंतप्रधान मोदीही त्यावर सकारात्मक विचार करतात. त्यामुळे काळजी नसावी, अशा प्रकारचं प्रतिउत्तर रोहीत पवार यांनी आपल्या ट्विटरवरून दिलं होतं.

मी साखरेवर बोललो पवार साहेबांवर नाही... कुकुटपालनाची मागणी केली असेल तर तुझ्यासाठी चांगली आहे, तुला गरज आहे. साखरेवर बोल्यावर मिरची का लागली??? मतदार संघावर लक्ष दे सगळीकडे नाक टाकू नकोस. नाहीतर साखर कारखान्यासारखी हालत होईल तुझी. हे रोहित पवार सारखे शेंबडे लुडबुड करत असतात. साखरेवर बोललो की हे अस्वस्थ का होतात कुणास ठाऊक?? महाराष्ट्राची मोठ्या प्रमाणात संपत्ती एका दिशेने जात असेल तर प्रश्न नाही विचारायचे?? ह्या वांग्याला सांगा ते ठाकरे मुंबईत राहून नाय काय करू शकले हा तर अजून स्वतःची धुवायला शिकतोय, अशा शब्दांत पुन्हा एकदा निलेश राणे यांनी पुन्हा रोहीत पवारांना टार्गेट केलं. 

हेही वाचा - मुंबईचे ठाकरे फाकरे माझं काय करू शकले नाहीत, तर नगरच्या कोपऱ्यात बसून काय करणार?

तर, आपले विचार, आपली भाषा व आपलं काम यातून आपण कोण आहोत हे लक्षात येतं. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्या सोडून द्यायच्या असतात, पण एकाच गोष्टीला कवटाळून आपल्या विचारांचं प्रदर्शन करण्यात निलेश राणे यांचा नंबर पहिला लागतो, असं म्हणत रोहीत पवारांनी त्यावर कडी केली. 

त्यानंतर संतापलेल्या निलेश राणे यांनी गल्लीतलं शेंबडं पोर लहान लहान गोष्टीसाठी कसं किर किर करत अस्त तसं एक शेंबडं माझ्या आजोबांच्या पत्रावर कोणी बोलू नका म्हणून किर किर करतंय... ह्या वांग्याची लायकी काय आमच्या नेत्यांवर बोलायची? कोपर्डीची घटना, मराठा क्रांती मोर्चे झाले पण हा लुक्का तेव्हा काही बोलला नाही. बोलणाऱ्याची लायकी बघून उत्तर देतो मी. धमकी आणि कळ काढायची भाषा माझ्याबरोबर करायची नाही. प्रदर्शन नाही हा ट्रेलर आहे. तुझ काम माहीत आहे मला, बोलत राहिलास तर त्याचं पण ट्रेलर देईन मग लोकंच चप्पलेच्या प्रदर्शनात बसवतील तुला, असं म्हणत आव्हान दिलं.

त्यावर बोलताना, चर्चा करण्यासाठी विचारांची लेव्हल लागते, ही लेव्हल मला जाणवली आहे. तसंच, अनेक अभ्यासू लोकांनी मला याकडे दुर्लक्ष करण्याचं सुचवलं. शिवाय मोकळ्या भांड्याचा आवाज जास्त येत असतो. त्यामुळे, या धमकीला मी घाबरत नाही, अन् अशा धमकींना कुणीही घाबरत नसतं, असं म्हणत  रोहीत पवार यांनी याकडे आपण दुर्लक्ष करत असल्याचं म्हटलं. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा