शिवसेना पक्षप्रमुखांचं इच्छुक उमेदवारांना मार्गदर्शन

 Pali Hill
शिवसेना पक्षप्रमुखांचं इच्छुक उमेदवारांना मार्गदर्शन
शिवसेना पक्षप्रमुखांचं इच्छुक उमेदवारांना मार्गदर्शन
शिवसेना पक्षप्रमुखांचं इच्छुक उमेदवारांना मार्गदर्शन
See all

वांद्रे - शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये युतीचे घोंगडे भिजत पडले असताना मंगळवारी शिवसैनिकांची गर्दी मातोश्रीवर बघायला मिळाली. भाजपशी युती होवो अथवा न होवो, कोणत्याही परिस्थितीत महानगरपालिकेवर भगवा फडकवायचाच या हेतूनं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर विभागवार पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीत शिवसेना शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुखासह मुंबईतल्या अनेक प्रभागातील इच्छुक उमेदवार सामील झाले होते. अल्पावधीतच शिवसेना पक्षप्रमुखांनी प्रभागवार शिवसैनिकांसह इच्छुक उमेदवार पडताळणीची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केलं.

शिवसेनेची भाजप सोबत युती होणार की नाही हे मला माहीत नाही. मात्र तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे देवाकडे प्रार्थना करा आणि दोन हात करण्यासाठी तयार रहा. पंतप्रधानांच्या नोटबंदी निर्णयामुळे 40 लाख कर्मचारी बेरोजगार झाल्याचं वाचून वाईट वाटलं. आपल्यावर कुरघोडी करू पाहणारा मित्र पक्ष पालिका निवडणूक जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. तरी, सर्व इच्छुक उमेदवारांनी आपल्यातील एकता टिकवून ठेवा. एक जागा आहे इच्छुक सहा आहेत. तर माझ्या जागेवर बसून तुम्ही पाच इच्छुकांना नाराज न करता एका उमेदवाराची निवड करा. तुम्ही निवडलात तरी पाच इच्छुक नाराज होणार, मी निवडला तरी होणार. यामुळे माझ्यावर अन्याय झाला असं समजू नका. आता मी आपल्या सर्वांसमोर उमेदवार निवडीचं काम अन्य नेत्यांवर सोपवतो. उमेदवारांचं कार्य पाहून उमेदवार दिला जाईल असं सांगत त्यांनी इच्छुकांची समजूत काढली. ‘मातोश्री’वर शिवसेनेच्या उमेदवार पडताळणीसाठी पार पडलेल्या बैठकीत धारावी, वडाळा, माहीम मतदारसंघातील शिवसैनिकांना कपटी आणि चाणाक्ष मित्रांपासून सावध राहण्याचा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. ​

Loading Comments