उद्धव ठाकरेंची भाजपावर आगपाखड

 Ghatkopar
उद्धव ठाकरेंची भाजपावर आगपाखड
Ghatkopar, Mumbai  -  

घाटकोपर - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी घाटकोपरमध्ये झालेल्या एका सभेत भाजपावर खरपूस टीका केली. पालिकेत पारदर्शकता नसल्याचा खोटा प्रचार भाजपा करत आहे. संपूर्ण देशातील सर्व पालिकांमध्ये मुंबई पालिकेत प्रत्येक खात्याचा हिशोब ठेवला असल्याचं सांगितलं जातं. भाजपाच्या सर्व उमेदवारांनी हुतात्मा स्मारक येथे जाऊन शपथ घेतली. तर, पुण्यातील सिंहागडावर जाऊनही शपथ घेण्यात आली. मग, उल्हासनगर, नागपूर आणि औरंगाबाद पालिका निवडणुकीत का नाही शपथ घेतली, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी या सभेत उपस्थित केला.

जेवढे नागरिक हे बँकेच्या रागेत उभे राहून मरण पावले. तेवढे नागरिक दहशतवाद्यांच्या हल्ल्यात देखील मरण पावले नव्हते. गृहिणींनी साठवलेल्या पैशाला मोदी सरकारने काळा पैसा ठरवलं. तसंच हार्दिक पटेल मातोश्रीवर आल्यानंतर अनेकांच्या पोटात गोळा आला होता. माहिती नसणारे मुंबईचे भले करणार का असा सवालही उद्धव ठाकरे यांनी या वेळी उपस्थित केला. या सभेत शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर, खासदार संजय राऊत, खासदार अाढळराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Loading Comments