Advertisement

पूरग्रस्त भागांची पाहणी करताना उद्धव ठाकरे-फडणवीस आमने-सामने

कोल्हापूर येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करत असताना हे दोन्ही नेते एकमेकांसमोर आले. मात्र एकमेकांना टाळण्याऐवजी या दोघांनीही पुढं होऊन संवाद साधला. यावेळी मोठी गर्दी झाली होती.

पूरग्रस्त भागांची पाहणी करताना उद्धव ठाकरे-फडणवीस आमने-सामने
SHARES

मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) तसंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दोघेही पूरग्रस्त भागांचे दौरे करत आहेत. योगायोगाने कोल्हापूर येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करत असताना हे दोन्ही नेते एकमेकांसमोर आले. मात्र एकमेकांना टाळण्याऐवजी या दोघांनीही पुढं होऊन संवाद साधला. यावेळी मोठी गर्दी झाली होती.  

कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी पुराचा फटका बसलेल्या शिरोळ येथील नृसिंहवाडी गावाला भेट दिली आणि निवारा केंद्रात राहत असलेल्या गावकऱ्यांची भेट घेत त्यांची विचारपूसस केली. तर, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे देखील प. महाराष्ट्राच्या तीन दिवसांच्या दौरावर आहे. त्यांनी देखील कोल्हापुरातील चिखली गावाची पाहणी करून तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला. 

हेही वाचा- शिवसेनेच्या आमदाराचा किरीट सोमय्यांवर १०० कोटींचा मानहानीचा दावा

पाहणी करत करत पुढं जात असतानाच हे दोघेही नेते कोल्हापुरातील शाहुवाडी चौकात समोरासमोर आले. मात्र यावेळी दोघांनीही एकमेकांना न टाळता पुढं येऊन संवाद साधला. राज्याच्या या दोन प्रमुख नेत्यांना पाहून आपापल्या व्यथा त्यांच्यापुढं मांडण्यासाठी गावकऱ्यांनी तिथं मोठी गर्दी केली. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर देखील तिथं उपस्थित होते.

या भेटीबाबत प्रवीण दरेकर यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं की, देवेंद्र फडणीस (devendra fadnavis) हे मागील काही दिवसांपासून कोकणासह पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. जनतेमध्ये संतप्त भावना दिसून येत आहेत. पाहणी दौरा सुरू असताना आम्ही येत आहोत, तुम्ही थांबल्यास बरं होईल, असा निरोप मुख्यमंत्र्यांकडून आला. त्यानुसार आम्ही थांबलो आणि ही भेट झाली. यावेळी परिस्थितीतून तातडीने मार्ग काढावा लागेल, अशी भूमिका फडणवीसांनी मांडली. या ठिकाणी दीर्घकालीन उपाययोजना कराव्या लागतील. त्यामुळे तातडीने बैठक बोलवावी, असं फडणवीस म्हणाल्याची माहिती दरेकरांनी दिली.

हेही वाचा- २ डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यावर विचार सुरू- छगन भुजबळ



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा