अखेर नाव घेतलंच!

Mumbai
अखेर नाव घेतलंच!
अखेर नाव घेतलंच!
See all
मुंबई  -  

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण भूमिपूजनाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते नारायण राणे एकाच व्यासपिठावर येतील का? आलेच तर एकमेकांचं नाव घेतील का? दोन कट्टर राजकीय शत्रू एकमेकांसोबत आल्याचे राजकीय पडसाद काय पडतील? यासारख्या अनेक प्रश्नांना उत्तरे अखेर मिळाली.

सभेचे शिष्टाचार अक्षरशः पार पाडत उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांनी आपापल्या भाषणाच्या सुरुवातीला एकमेकांच्या नावांचा आदराने उल्लेख केला आणि समर्थक, विरोधक, राजकीय विश्लेषक, आदींच्या भुवया उंचावलेल्या राहिल्या. सर्वसामान्यांची प्रतिक्रिया मात्र, चला उरकलं एकदाचं. गंगेत घोडं न्हालं. अशीच राहिली असणार आणि हो... नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्याही नावाचा आदराने उल्लेख केला. अर्थात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा उल्लेख राणे यांनी 'कार्यकारी अध्यक्ष' असा केला. पण चालायचंच. नाव घेतले, हे ही नसे थोडके.


काय म्हणाले उद्धव ठाकरे...  

- माझे पूर्वीचे सहकारी नारायणराव राणे आणि सुरेश प्रभू
- चौपदरीकरणाच्या भूमिपूजनामुळे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण झाले
- एका छताखाली वेगवेगळ्या घोषणा का?
- विकासासाठी एका छताखाली येणे आवश्यक
- विकासाच्या खूप गप्पा झाल्यात, पण कोकणचा कॅलिफोर्निया झाला नाही
- बोलून दाखवण्यापेक्षा कामातून दाखवा


काय म्हणाले नारायण राणे...  

- राजकारण आणि भावना विकासाच्या आड येता कामा नये
- केंद्रात नितीन गडकरी आणि राज्यात फडणवीस हे सर्वांगिण विकास करत आहेत
- चांगल्या गोष्टीचे स्वागत आणि चांगल्या गोष्टीचे अनुकरण कोकणी माणसाने करावे


आक्रमक झाले समर्थक


भूमिपूजनाचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांनी घोषणा दिला. त्यानंतर राणे समर्थकही आक्रमक झाले आणि त्यांनीही घोषणाबाजी केली. मात्र पोलिसांनी वातावरण शांत केले.


हे देखील वाचा - राणेंच्या बॅनरवर काँग्रेस नेत्यांना स्थानच नाही !


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.