Advertisement

राज्य सरकार लवकरच भरणार ७० हजार रिक्त पदे

राज्यात ७० हजार रिक्त पदांची (Vacancy) भरती (Recruitment) करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी घेतला आहे.

राज्य सरकार लवकरच भरणार ७० हजार रिक्त पदे
SHARES

राज्यात ७० हजार रिक्त पदांची (Vacancy) भरती (Recruitment) करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी घेतला आहे. बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत या जागा भरण्याबाबत चर्चा झाली. त्यामुळे राज्यातील बेरोजगारांसाठी ही मेगाभरती सुवर्णसंधी असणार आहे. 

२०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ७२ हजार पदांची भरती करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार २०१८ मध्ये ३६ हजार पदं तर २०१९ मध्ये ३६ हजार पदं भरली जाणार होती. मात्र, त्यानंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने ही मेगाभरती झाली नाही. आता राज्यात शिवसेना (Shiv Sena), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) चं सरकार स्थापन झालं आहे. नवीन सरकारमधील मंत्र्यांनी या पदांची भरती लवकरात लवकर करण्यात यावी असा आग्रह धरला आहे. त्यानुसार राज्य सरकार आता ही भरती प्रक्रिया सुरु करणार आहे.

ग्रामविकास, गृह, कृषी, पशू व दुग्धसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, जलसंधारण, नगरविकास आणि आरोग्य विभागात सर्वाधिक रिक्‍त पदे आहेत.

              विभाग                     जागा

               ग्रामविकास              11000

               गृह विभाग                7111

                कृषी विभाग              2500

 पशु व दुग्ध संवर्धन       1047

सार्वजनिक बांधकाम       8330

जलसंपदा                    8220

जलसंधारण                 2433

नगरविकास                  1500

आरोग्य                       10,560



हेही वाचा -

किती बालहट्ट पुरवायचे? आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना टोला

मुनगंटीवारांना पडताहेत ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा