Advertisement

युतीसाठी मी नकारात्मक नव्हतो - उद्धव ठाकरे


युतीसाठी मी नकारात्मक नव्हतो - उद्धव ठाकरे
SHARES

मुंबई - युतीसाठी मी कधीच नकारात्मक नव्हतो, असं म्हणत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती करण्याबाबतचे संकेत दिलेत. आजपासून चर्चा सुरू होईल अशी शक्यता आहे. शिवसेनेकडून तिघं आणि भाजपाकडून तिघं अशी चर्चा होईल. शेवटचा निर्णय मी आणि देवेंद्र फडणवीस मिळून घेणार असल्याचंही त्यांनी या वेळी स्पष्ट केलं. तसंच गुरुवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या गुजराती सेलचे अध्यक्ष शभरत धनानी यांच्यासह असंख्य गुजराती समाजातील कार्यकर्ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करणार आहेत असंही त्यांनी सांगितलं.

महापालिकेत आमचा शत्रू भाजप आहे असं राज ठाकरे म्हणाले, यावर उद्धव ठाकरे यांनी चांगलंच प्रत्युत्तर दिलं की शिवसेनेबद्दल अनेकांच्या मनात गैरसमज होते ते दूर होत आहेत ही चांगली गोष्ट आहे. 1992/93 पासून गुजराती समाजानं पाहिलंय की कोण त्यांच्या पाठीशी आहे. मी हिंदू आहे म्हणजे मी हिंदुत्वाच्या नावावर मते मागतोय असा होत नाही. मी हिंदू आहे हे सांगायला मला कुणाच्या परवानगीची गरज नसल्याचं ही उद्धव यांनी या वेळी स्पष्ट केलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा