चलो पंढरपूर...सोमवारच्या सभेसाठी सेनेकडून जय्यत तयारी

निवडणुका तोंडावर आल्यानं शिवसेना कामाला लागली आहे. त्यातूनच चलो पंढरपूर अशी हाक शिवसेनेनं दिली आहे असं म्हटलं जात आहे. तर अयोध्येप्रमाणेच पंढरपूर दौऱ्यातही राम मंदिर हा प्रमुख मुद्दा असणार आहे.

SHARE

चलो अयोध्या म्हणत अयोध्येत शक्तिप्रदर्शन केल्यानंतर आता शिवसेनेनं चलो पंढरपूर अशी हाक दिली आहे. २४ डिसेंबरला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पंढरपुरात जोरदार शक्तिप्रदर्शन करणार असून चंद्रभागेच्या तीरावर अयोध्येतील शरयू तीराप्रमाणेच आरतीही करणार आहेत. 

अयोध्येप्रमाणेच पंढरपुरचा शक्तिप्रदर्शनाचा, उद्धव ठाकरेंच्या महासभेचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेनेचे मुंबईतील आणि पंढरपुरातील नेते-कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. शिवसेनेकडून महासभेची जय्यत तयारी सुरू असून आता पंढरपुरात उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.


विठुरायाकडं साकडं

राम मंदिर उभारणीसाठी भाजप सरकारनं गेल्या साडेचार वर्षात काहीही न केल्याचं म्हणत उद्धव ठाकरे यांनी चलो अयोध्या अशी हाक दिली. त्यानंतर ते सातत्यानं भाजपाविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसले आहेत. तर आता निवडणुका तोंडावर आल्यानं शिवसेना कामाला लागली आहे. त्यातूनच चलो पंढरपूर अशी हाक शिवसेनेनं दिली आहे असं म्हटलं जात आहे. तर अयोध्येप्रमाणेच पंढरपूर दौऱ्यातही राम मंदिर हा प्रमुख मुद्दा असणार आहे. कारण राम मंदिर बांधण्याची सुबुद्धी सरकारला द्या असं साकडंच उद्धव ठाकरे यांच्याकडून यावेळी विठुरायाकडे घातलं जाणार आहे.


विठाईचा शुभारंभ

चंद्रभागेच्या तिरावर आरती करत या ठिकाणी शिवसेनेची महासभा होणरा असून या सभेला अंदाजे पाच लाख लोक उपस्थीत राहतील असा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. तर यात वारकऱ्यांची मोठी उपस्थिती असणार असल्याचंही म्हटलं जात आहे. कारण यावेळी शिवसेनेच्या महासभेबरोबरच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा (एसटी) च्या विठाई या नव्या एसटी सेवेचा शुभारंभही उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. 


१००० विठाई गाड्या

वारीला येणाऱ्या वारकऱ्यांना वारीस येणं वा वारीवरून घरी परतणं सोपं व्हावं यासाठी एसटीकडून १००० विठाई गाड्या तयार करण्यात येत आहेत. आकर्षक आणि विशिष्ट प्रकारची रचना असलेल्या १० गाड्या सध्या तयार झाल्या आहेत. त्या दहा गाड्यांचा शुभारंभ यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. वारी संपल्यानंतर या गाड्या राज्यभरातील विविध एसटी डेपोअंतर्गत सर्वसामान्य फेऱ्यांसाठी वापरण्यात येणार असल्याचंही या अधिकाऱ्याने सांगितलं आहे.हेही वाचा - 

चंद्रशेखर आझादांच्या वरळीतील सभेला परवानगी नाकारली, सभा घेण्यावर भीम आर्मी ठाम

१ जानेवारीला भीमा-कोरेगावला जाणारच; प्रकाश आंबेडकर यांचा निर्धार
संबंधित विषय
ताज्या बातम्या