Advertisement

तर पंतप्रधानही घराबाहेर पडतील, उद्धव ठाकरेंचा खोचक सल्ला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करणारे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थाेडं दिल्लीलाही जावं, जेणेकरून पंतप्रधान नरेंद्र मोदीही घराबाहेर पडतील, असा खाेचक सल्ला मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना दिला.

तर पंतप्रधानही घराबाहेर पडतील, उद्धव ठाकरेंचा खोचक सल्ला
SHARES

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करणारे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थाेडं दिल्लीलाही जावं, जेणेकरून पंतप्रधान नरेंद्र मोदीही घराबाहेर पडतील, असा खाेचक सल्ला मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना दिला. (uddhav thackeray slams devendra fadnavis over aid for flood affected farmers in maharashtra)

परतीच्या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांना मोठा तडाखा दिला आहे. हातातोंडाशी आलेली पिकं पाण्यात वाहून गेली आहेत. त्यातच एका बाजूला मुख्यमंत्र्याचा तर दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षनेत्यांचा पाहणी दौरा सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीवरून राजकारण चांगलंच तापलं आहे.

कोणतंही संकट आलं की सगळी जबाबदारी केंद्रावर ढकलायची आणि आपण नामानिराळं व्हायचं हे ठाकरे सरकारचं धोरण योग्य नाही, असा आरोप पुण्याच्या दौऱ्यावर असलेले देवेंद्र फडणवीस यांनी केला हाेता. तसंच अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांना मदत मिळवून देण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरात बसून काम का करतात? याचा खुलासा करत आहेत. खरं तर राज्य सरकारचा नाकर्तेपणा लोकांसमोर आला असून तो लपवणं हेच आता शरद पवारांचं काम उरलं आहे. परंतु शेतकऱ्यांना टोलवाटोलवी नको, तर प्रत्यक्ष मदत हवी आहे, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं.

हेही वाचा - केंद्रातलं सरकार परदेशी नाही, मदत मागण्यात गैर काय?- उद्धव ठाकरे

त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात अतिवृष्टी झाल्यानंतर शुक्रवारी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन आला होता. पूरस्थितीबाबत माहिती घेताना त्यांनी आवश्यक ती मदत करू, असं मला आश्वासन दिलं. अशा परिस्थितीत राज्य सरकारने केंद्राकडे मदत मागितली तर त्यात बिघडलं कुठे? केंद्रातलं मोदी सरकार हे देशाचं सरकार आहे, ते परदेशातील सरकार नाही. पक्षपातीपणा न करता सर्व राज्यांना मदत करणं ही केंद्राची जबाबदारी आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांना सुनावलं.

तसंच केंद्र सरकार आणि राज्य सरकार पूरग्रस्त जनतेसाठी काय करेल याचा विचार करण्यापेक्षा तुम्ही ज्या राज्याचे आहात त्यासाठी आधी काम करा. बिहारमध्ये प्रचार करण्यापेक्षा आपल्या राज्यात लक्ष घाला. तुम्ही राज्याचे विरोधी पक्षनेते आहात आणि महाराष्ट्रातील एक जबाबदार नेते आहात, याचं भान राहू द्या. सध्या नियमितपणे बिहारला जाताना त्यांनी थोडं दिल्लीतही जावं. ते दिल्लीत गेले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील घराबाहेर पडतील, असा खोचक सल्लाही मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना दिला.

हेही वाचा - राज्य सरकारचा नाकर्तेपणा लपवणं एवढंच पवारांचं काम- देवेंद्र फडणवीस


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा