Advertisement

University Exams 2020: तर परीक्षा घ्यायच्या कशा? उदय सामंत यांचा यूजीसीला सवाल

विद्यापीठ अनुदान आयोगाने मार्गदर्शक सूचना देणं आवश्यक होतं. पण तसं न झाल्यानेच राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला, असं राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं.

University Exams 2020: तर परीक्षा घ्यायच्या कशा? उदय सामंत यांचा यूजीसीला सवाल
SHARES

सध्याच्या परिस्थितीत परीक्षा घ्यायच्या असतील तर कन्टेन्मेंट झोनमधील विद्यार्थी आणि गावी गेलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा कशी द्यायची, पेपर सेट करणे, पेपर तपासणी, विशेषतः कंन्टेन्मेट झोनमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी क्वारंटाइन सुविधा कशी असेल? असे अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत. याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने मार्गदर्शक सूचना देणं आवश्यक होतं. पण तसं न झाल्यानेच राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला, असं राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं.

यूजीसीचे निर्देश

केंद्रीय गृहमंत्रालयानं विद्यापीठ परीक्षांना परवानगी देत या परीक्षा यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार घेण्यात याव्यात, असं गृहमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. या परीक्षांसाठी विद्यापीठ आणि संस्थांना सप्टेंबरपर्यंतचा अवधी देण्यात आला आहे. यामुळे नवीन वादाची ठिणगी पडली आहे. यावर पत्रकार परिषदेत उदय सामंत यांनी परीक्षा रद्द करण्यामागची राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली.

राजकारण नको

राज्य शासन कुलगुरूंशी चर्चा करून निर्णय घेत नाही हा अपप्रचार केला जात आहे, जो पूर्णपणे चुकीचा आहे. परीक्षांबाबतचे सर्व निर्णय हे कुलगुरूंशी चर्चा करूनच घेतले जातात. उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून विद्यापीठांच्या अडचणी आणि प्रश्नांना सोडवण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली जात आहे. विशेषतः विद्यापीठांना आवश्यक ती सर्व मदत राज्य शासन करीत आहे. शासनाची भूमिका प्रामाणिक आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर कोणीही राजकारण करू नये, असा आवाहन उदय सामंत यांनी केलं.

हेही वाचा - University Exams 2020: विद्यार्थ्यांचं आरोग्य, भविष्याचा विचार करूनच परीक्षा रद्द- उदय सामंत

यूजीसीला पत्र

कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत भारत जगामध्ये तिसऱ्या स्थानी असून, महाराष्ट्र हे सर्वाधिक कोरोना बाधित राज्य आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये अंतिम वर्षाच्या सत्राच्या १० लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची परीक्षा घेणं अतिशय जिकीरीचं होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक, पूरक कर्मचारी तसेच इतर यंत्रणांचं स्वास्थ धोक्यात येऊ शकेल. म्हणून पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेऊ नयेत असं पत्र विद्यापीठ अनुदान आयोगाला पाठविल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.

आरोग्य धोक्यात

सध्या विविध शैक्षणिक संस्था, वसतीगृहे आणि इतर सुविधा या विलगीकरणासाठी तसंच कोरोना संबंधित इतर कारणांकरिता प्रशासनाद्वारे अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बहुतांशी विद्यार्थी हे त्यांच्या मूळ गावी परतले असल्याने, परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांचा परतीचा प्रवास, त्यांची निवास व भोजन व्यवस्था या चिंतेच्या बाबी आहेत. असं केल्याने विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात येऊन त्यांच्या भवितव्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच काही इतर राज्यांमध्ये तसेच देशांमध्ये परिक्षा घेतल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना सदर विषाणूची लागण झाल्याच्या घटना घडल्या आहेत असंही, सामंत यांनी या पत्राद्वारे निदर्शनास आणून दिलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा