Advertisement

कोरोना गेलाय, लाॅकडाऊन उठलंय या भ्रमात राहू नका- उद्धव ठाकरे

काही ठिकाणी माफक स्वरूपात लाॅकडाऊनचे नियम शिथील करण्यात आले आहेत. याचा अर्थ कोरोना गेलाय आणि लॉकडाऊन संपला असं बिलकूल नाही. उगाच गाफील राहू नका, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

कोरोना गेलाय, लाॅकडाऊन उठलंय या भ्रमात राहू नका- उद्धव ठाकरे
SHARES

राज्यावर असलेलं कोरोनाचं संकट अजून टळलेलं नाही. राज्याचं रुतलेलं अर्थचक्र हळूहळू बाहेर काढण्यासाठी काही ठिकाणी माफक स्वरूपात लाॅकडाऊनचे नियम शिथील करण्यात आले आहेत. याचा अर्थ कोरोना गेलाय आणि लॉकडाऊन संपला असं बिलकूल नाही. उगाच गाफील राहू नका. कारण गर्दी केल्यास आणि सोशल डिस्टन्सिगचे नियम न पाळल्यास पुन्हा बंधने टाकावी लागतील, अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला इशारा दिला. 

उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून सोमवारी २० एप्रिल रोजी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पालघरमध्ये घडलेल्या माॅब लिंचिंगच्या घटनेवर प्रामुख्याने भाष्य केलं. सोबतच काही भागात लाॅकडाऊन अशत: प्रमाणात उठवण्यात आल्याने गाफील असणाऱ्यांनाही सुनावलं आहे.

हेही वाचा - माॅब लिंचिंगची घटना धार्मिक नाही, आग भडकवण्याचा प्रयत्न करू नका- उद्धव ठाकरे

म्हणून थोडी सूट

यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील उद्योग सुरू करण्यासाठी लॉकडाऊनमधून थोडी सूट दिली आहे. पण त्यांनाही काही अटी घातल्या आहेत. राज्याचं रुतलेलं अर्थचक्र हळुहळू बाहेर काढण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. पण यावेळी आपण कसं वागतो त्याची ही चाचणी आहे. याचा अर्थ लॉकडाऊन संपला आणि कोरोनाचं संकट टळलं असा होत नाही हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. 

तर पुन्हा बंधने

राज्यावर असलेलं संकट अद्याप टळलेलं नाही. गेल्या ३६ तासात ८३५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. गर्दी वाढली आणि सोशल डिस्टन्सिंग पाळलं गेलं नाही, तर पुन्हा बंधनं टाकावी लागतील. कोरोनाची लढाई आपल्याला एकजुटीने लढायची आहे. नियम पाळूनच ही लढाई आपल्याला जिंकता येईल, असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा